हातात बंदूक आणि डोळ्यात आग घेऊन सपना चौधरी झाली ‘गुंडी’, विश्वास बसत नाही ना मग वाचा का झाली ती ‘गुंडी’
आपल्या डान्सच्या लटक्या झटक्याने, ठुमक्यांनी स्टेजवर आग लावणारी सपना चौधरी खूपच प्रसिद्ध आहे. सुरुवातीला यूपी, हरियाणा पुरती ओळख असणारी सपना बिग बॉसमध्ये आल्यानंतर संपूर्ण भारतात प्रसिद्ध झाली. सपनाने तिच्या डान्सने आणि लूक्सने सर्वाना वेड लावले आहे. सपनाचा डान्स फक्त स्टेजपुरताच मर्यादित नसून ती तिच्या डान्सचे व्हिडिओ सोशल मीडिया, यूट्यूबवर देखील अपलोड करत असते.
लवकरच सपना तिच्या फॅन्ससाठी ‘गुंडी’ हे नवीन गाणे घेऊन येणार आहे. ह्या गाण्याचा एक टिझर तिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेयर केला आहे. या टीझरमध्ये गाव की गोरी असणाऱ्या सपनाच्या हातात बांगड्यांऐवजी चक्क बंदूक दिसत आहे. तिचा हा दमदार अवतार सर्वानाच आवडत असून तशा कमेंट्स देखील तिला मिळत आहे. सपनाचे हे ‘गुंडी’ अजून प्रदर्शित झाले नसले तरी या गाण्याचा टिझर तिने पोस्ट केला आहे. ऑलिव्ह ग्रीन कलरचा शर्ट आणि ब्लॅक पॅन्ट अशा वेगळ्या लुकमध्ये सपना दिसत आहे.
सपनाने हा टिझर शेयर करताना लिहिले, “युद्ध लड़ो थाम युद्ध लड़ो – उठो नारियों खुद लड़ो” सपनाचा हातात डोळ्यात आग आणि बंदूक असलेला असा धाकड अंदाज पहिल्यांदाच प्रेक्षकांना पाहायला मिळत असल्याने, हा टिझर चांगलाच चर्चेत आला आहे. तिच्या फॅन्सला देखील तिचा हा अनोखा अंदाज प्रचंड आवडत असून, खूप कमी वेळात हा टिझर व्हायरल झाला आहे.
काही तासांतच या व्हिडिओला आतापर्यंत ८० लाइक्स मिळाले आहेत. नेहमी पारंपरिक वेशभूषेत दिसणारी सपना तिच्या या नवीन गाण्याच्या माध्यमातून एका वेगळ्या स्वरूपात दिसणार आहे. वेगळा असणारा तिचा हा अंदाज चांगलाच भाव खाऊन जात आहेत. या टिझर पूर्वी ‘गुंडी’ या गाण्याचे एक पोस्टर प्रदर्शित झाले होते, आणि त्या पोस्टरला देखील प्रचंड लाइक्स मिळाले होते. तिचे हे नवीन गाणे सुद्धा मागच्या गाण्यांप्रमाणेच सुपरहिट होणार यात शंका नाही.
मागच्या २ महिन्यात सपनाचे जवळपास पाच गाणी प्रदर्शित झाली आहेत. त्यात चटक मटक, कतल, चंद्रावल, लोरी आदी गाण्यांचा समावेश आहे. ही सर्व गाणी अजूनही ट्रेण्डिंगमध्ये आहे.










