हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री फिट आणि बोल्ड दिसण्यासाठी नेहमीच जिम करत असतात. रेग्युलर वर्कआउट करत असतात. या अभिनेत्रींच्या वर्कआउट आणि जिममधील व्हिडिओ नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल झालेले आपण पाहत असतो. सध्या अभिनेत्री करीना कपूरचा (Kareena Kapoor) असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये करीना वर्क आउट करताना दिसत आहे. या व्हिडिओसोबत तिने आता बिर्याणीला राम राम ठोकायची वेळ आल्याचेही म्हणले आहे.
करीना कपूर ही हिंदी चित्रपटसृष्टीतील एक आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. आपल्या अभिनयाने आणि घायाळ करणार्या सौंदर्याने तिने चित्रपट जगतात वेगळी ओळख निर्माण केली आहे. करीनाच्या चित्रपटांप्रमाणेच तिच्या सोशल मीडिया पोस्टचीही नेहमीच चर्चा होत असते. आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन ती नेहमी तिचे बोल्ड फोटो शेअर करताना दिसते. नुकताच करीनाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरुन वर्कआऊट करतानाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्याची सध्या चर्चा रंगली आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये करीना आपल्या घरीच कवायत करताना दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करत “जेव्हा तुमचा योगा शिक्षक तुम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करतो तेव्हा आता बिर्याणी आणि हलवा खाणे बंद करून त्याला राम राम ठोकायची वेळ आली आहे असे समजावे” असे भन्नाट कॅप्शन दिले आहे. या व्हिडिओवर करीनाच्या चाहत्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत.
दरम्यान अभिनेत्री करीना कपूर सध्या सैफ अली खानसोबत वैवाहिक जीवन व्यतीत करत आहे. अनेकदा ती सैफ अली खानसोबत आणि तिच्या मुलांसोबत फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. करीनाने हिंदी चित्रपटसृष्टीतील सगळ्या प्रमुख अभिनेत्यांसोबत चित्रपट क्षेत्रात काम केले आहे. करीना सोशल मीडियावर सतत चर्चेत असते. बर्याचदा तिच्या पोस्ट मुळे तिला नेटकऱ्यांनी ट्रोलही केले आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा –