छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध मालिका ‘भाभी जी घर पर है’ ही प्रेक्षकांमध्ये खूपच लोकप्रिय आहे. हा कार्यक्रम बराच काळापासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. कार्यक्रमातील प्रत्येक पात्राला त्याच्या उत्कृष्ट अभिनयामुळे पसंती मिळत आहे. यामध्येच अंगुरी भाभी आणि विभूती नारायण मिश्रा यांच्यातील आंबटगोड गोष्टी नेहमीच प्रेक्षकांच्या आवडीचा विषय आहे.
मालिकेतील भाभी म्हणून पात्र साकारलेली सौम्या टंडन हिने या मालिकेला रामराम ठोकताच त्या जागी आता मराठमोळी अभिनेत्री नेहा पेंडसे ही त्याजागी दिसणार आहे. बऱ्याच प्रतीक्षेनंतर अनिता भाभी पुन्हा भाभीजी घरपे है मध्ये परतली आहे. जीची आठवण प्रेक्षक फार काळ काढत होते. त्यामुळे पुन्हा एकदा विभूती नारायणच्या घरात ती दिसेल आणि याचमुळे तिवारीजींच्या आनंदाला पारावर उरणार नाही.
या भूमिकेमुळे नेहासमोर एक आव्हान असणार असून तिच्या चाहत्यांच्या तिच्याकडून फार अपेक्षा आहेत. कारण सौम्या टंडन हिने आपल्या अभिनयाची एक ऊत्तम छाप ही प्रेक्षकांच्या मनावर पाडली होती. सौम्या टंडनने ही मालिका सोडल्यानंतर नेहा पेंडसे तिची जागा घेत आहे. त्यामुळे गोरी मॅमच्या अवतारात पहायला तिचे चाहते फारच उत्सुक आहेत. या मालिकेत सामील होण्यासाठी देखील ती प्रंचड उत्साहात आहे.
या मालिकेचे चित्रीकरण नुकतेच सुरू झाले असून नेहाने आपले फोटो सोशल मीडियावर शेयर केले आहेत. त्यात लाल रंगाचा साडीमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे आणि गळ्यातील सेट आणि लाल लिपस्टिक मुळे तिच्या या फोटोमुळे तिच्या सौंदर्यात आणखीनच भर पडत आहे. त्याचवेळी तिने आणखी एक फोटो टाकला आहे, ज्यात या मालिकेतील इतर सदस्य देखील दिसत आहे आणि या फोटोला शेयर करत तिने सर्व रसिकांसाठी प्रेम देऊन आभार व्यक्त केले आहे.
तिच्या आणखी एका फोटोमध्ये तिने छापील साडी परिधान केली आहे आणि त्यावर असलेली डिजाईन खूपच आकर्षक दिसत आहे. त्याचप्रमाणे आपल्या चौथ्या फोटोमध्ये तिने लाल रंगाचे कपडे परिधान केले आहेत. तिच्या या सर्वच फोटोना प्रेक्षकांनी लाईक्सचा पाऊस पडला असून त्यासाठी भरभरून प्रतिक्रिया आणि शुभेच्छा देखील येत आहेत.
नेहा यापुर्वी अनेक मालिकांत देखील दिसली होती, ज्यात कहानी घर घर की, क्योकी सास भी कभी बहू थी आणि बिगबॉस सिजन १३ या कार्यक्रमाचा समावेश आहे. याशिवाय तिने मराठी, तामिळ, तेलगू, मल्याळम, हिंदी आणि इतर चित्रपटात देखील काम केले आहे. सर्वप्रथम सन १९९९ च्या ‘ प्यार का कोई खेल नही’ या या चित्रपटातुन तीने आपल्या करियरची सुरवात केली होती. सोबतच दाग द फायर, दिवाने, तुमसे अच्छा कोण है, देवदास कुरुक्षेत्र, असीमा, बाळकडू आणि नटसम्राट या चित्रपटात तिने काम केले आहे.