Sunday, October 19, 2025
Home बॉलीवूड सुपरहिट सिनेमे दिलेली बॉलीवूड अभिनेत्री तिसऱ्यांदा होणार आई, फोटो पोस्ट करत दाखवले बेबी बंप

सुपरहिट सिनेमे दिलेली बॉलीवूड अभिनेत्री तिसऱ्यांदा होणार आई, फोटो पोस्ट करत दाखवले बेबी बंप

एकीकडे महिन्याभरापूर्वी अनुष्का आणि विराटने त्यांच्या चिमुकलीचे स्वागत केले आहे, करीना आणि सैफ ह्याच महिन्यात दुसऱ्यांदा आई, बाबा होणार आहे. तर दुसरीकडे अभिनेत्री लिसा हेडनने ती लवकरच तिसऱ्यांदा आई होणार असल्याचे जाहीर केले आहे.

आई होणे ही प्रत्येक स्त्री साठी स्वर्ग सुख देणारी गोष्ट असते. आपल्या आत एक बाळ आहे, ही जाणीवच मुळी सुखावणारी असते. प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात ही गोष्ट घडतेच. त्याचमुळे सर्व स्त्रियांना या काळातील एक न एक क्षण आठवणीत राहील किंवा तो क्षण संस्मरणीय करता येईल असे काही करायचे असते. पूर्वी अशा सोयी सुविधा नव्हता मात्र आता तंत्रज्ञानाने अशा गोष्टी उपलब्ध करून दिल्या आहेत, ज्यांमुळे सर्व स्त्रिया त्यांचा हा अनमोल काळ सदैव फोटोंच्या रूपाने आठवणीत ठेऊ शकतात.

लिसाने देखील तिचा हा प्रेग्नेंसीचा काळ अविस्मरणीय करण्यासाठी फोटोंचा आधार घेतला आहे. नुकतेच लिसाने तिचे फोटोशूट केले आहे. यातील एक फोटो तिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट केला असून, यात ती बिकिनी घालून तिचे बेबी बंप दाखवत आहे. तिच्या या फोटोला काही तासातच हजारो लाइक्स आणि कमेंट्स आल्या आहेत.

सुंदर आणि शांत समुद्र, सूर्याची मंद किरणे मंद प्रकाश आणि यात काळया रंगाच्या बिकिनी आणि डोक्यावर गोल हॅट घातलेली लिसा दिसत आहे. या फोटोत तिचे बेबी बंप स्पष्ट दिसत आहे. लिसाच्या या फोटोवर नेटकऱ्यांनी तिला शुभेच्छा दिला तर काहींनी सांभाळून राहण्याचा, काळजीचा सल्ला देखील दिला आहे. हा फोटो शेयर करताना लिसाने लिहिले, ” जानेवारी २०२१”. मागच्या महिन्यात हॉंगकॉंगमधल्या एका समुद्र किनारी हा फोटो काढला आहे.

लिसाने मागच्याच आठवड्यात ती तिसऱ्यांदा आई होणार असल्याचे सांगितले होते. याबाबत तिने एक क्युट व्हिडिओ पोस्ट करत ही गोड बातमी सर्वांना दिली होती.

लिसाने २०१० साली सोनम कपूर आणि अभय देओल यांची मुख्य भूमिका असणाऱ्या ‘आयेशा’ सिनेमातून अभिनयात पदार्पण केले होते. यानंतर ती शौकिन्स, क्वीन, हाऊसफुल ४, ये दिल है मुश्किल आदी सिनेमातून मोठ्या पडद्यावर झळकली होती.

 

हे देखील वाचा