Tuesday, December 3, 2024
Home कॅलेंडर BIRTHDAY SPECIAL : रश्मिका मंदान्नाच्या ‘या’ सवयीमुळे तिचे कुटुंबीय आहेत नाराज, जिद्दीपुढे घरच्यांचेही नाही ऐकत अभिनेत्री

BIRTHDAY SPECIAL : रश्मिका मंदान्नाच्या ‘या’ सवयीमुळे तिचे कुटुंबीय आहेत नाराज, जिद्दीपुढे घरच्यांचेही नाही ऐकत अभिनेत्री

‘पुष्पा’ चित्रपटात श्रीवल्लीची भूमिका साकारून सध्या चर्चेत असलेली अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) होय. या चित्रपटात रश्मिकाने तिच्या गोंडसपणाने सर्वांची मने जिंकली आहेत. रश्मिकाचे गोंडस दिसणे आणि तिचे स्मितहास्य हे वेड लावणारे आहे. पण तुम्हाला माहीत आहे का की, सुंदर दिसणारी श्रीवल्लीही तिच्या घरच्यांकडे खूप हट्ट करते. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत रश्मिकाने तिच्या आणि तिच्या कुटुंबातील सदस्यांशी संबंधित एक किस्सा चाहत्यांसोबत शेअर केला.

अगदी लहानपणी फिल्मी दुनियेत पदार्पण करणारी रश्मिका तिच्या कामाला समर्पित आहे. अशा परिस्थितीत ती स्वतःच्या आणि तिच्या कामामध्ये कोणालाच येऊ देत नाही, अगदी तिच्या पालकांनाही नाही. खुद्द रश्मिकाने याचा खुलासा केला आहे. माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत रश्मिकाने सांगितले होते की, जेव्हा ती कोरोनामध्ये शूट करण्यासाठी घरातून बाहेर पडायची, तेव्हा तिचे कुटुंबीय खूप घाबरायचे. पण रश्मिका तिच्या कामाबद्दल किती जिद्दी आहे, हे त्यांना माहीत असल्यामुळे तिचे घरचे तिला याबद्दल काहीच बोलत नाही.

रश्मिका म्हणाली की, “त्यांनी पाहिलं की मी एक अभिनेत्री आहे आणि मला शूटिंगसाठी सेटवर माझे मास्क काढावे लागले आणि ते काम आहे म्हणून ते काहीच बोलणार नाहीत. मी माझ्या कामात कोणाला बोलू देत नाही. माझ्या पालकांना माहित आहे की, मी त्यांचे ऐकणार नाही… जर त्यांनी शुटिंगला जाऊ नको किंवा वातावरण सुरक्षित नाही असे सांगितले तरीही. पण मला वाटायचं की, मी माझं शूट पूर्ण करावं, कारण या प्रोजेक्टसाठी खूप मेहनत आणि करोडो रुपये खर्च करण्यात येतात.”

‘पुष्पा’ चित्रपटासोबत एका रात्रीत स्टार बनलेली रश्मिका सर्वांच्या मनावर राज्य करत आहे आणि लवकरच साऊथ सिनेसृष्टीतील हा चेहरा बॉलिवूडमध्येही दमदार एन्ट्री करणार आहे. रश्मिका लवकरच सिद्धार्थ मल्होत्रासोबत ‘मिशन मजनू’ या चित्रपटात दिसणार आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘मग जा पाकिस्तानला’ म्हणत अभिनेत्री स्वरा भास्करच्या ‘त्या’ ट्विटला नेटकऱ्यांचे सणसणीत उत्तर

राम चरण अन् व्यंकटेशसोबत सलमान नाचला लुंगी डान्सवर; चाहते म्हणाले,’साँग ऑफ द इयर’

author avatar
Tejswini Patil

हे देखील वाचा