Friday, December 27, 2024
[aioseo_breadcrumbs]

ढिंचॅक पूजाचे ‘गाड़ी मेरी टू सीटर’ हे नवीन गाणे रिलीज, नेटकऱ्यांकडून गाण्यावर आले हटके मीम्स

ढिंचॅक पूजा सर्वांना नक्कीच आठवत असेल. सोशल मीडिया वापरणाऱ्या बहुतांश जणांना ढिंचॅक पूजा नक्कीच माहित आहे. सेल्फी मैंने ले ली आज आणि होगा ना कोरोना असे विचित्र गाणे लिहिणारी आणि गाणारी ढिंचॅक पूजा तसे पहिले तर बऱ्यापैकी लोकप्रिय आहे. तिचा आवाज आणि गाण्याचे आगळे वेगळे शब्द यामुळे ढिंचॅक पूजा ओळखली जाते.

याच ढिंचॅक पूजाचे नवीन गाणं ‘गाड़ी मेरी टू सीटर’ हे प्रदर्शित झाले आहे. मंगळवारी हे गाणे सोशल मीडियावर प्रदर्शित झाले आहे. या गाण्यावर काही नेटकरी चांगल्या कमेंट्स करत आहे तर काही नेटकऱ्यांनी या गाण्यावरून तिचा मजाक उडवायला सुरुवात केली आहे.

ढिंचॅक पूजाचे ‘गाड़ी मेरी टू सीटर’ हे गाणे यूट्यूबवर ट्रेण्डिंगमध्ये सामील झाले आहे. आतापर्यंत या गाण्याला लाखो व्युज मिळाले असून या गाण्यात पूजा पिवळ्या रंगाच्या पोर्श कारमध्ये बसून तिच्या कूल अंदाजमध्ये दिसत आहे.

ढिंचॅक पूजाचे हे नवीन गाणे जास्त कोणाला आवडले नसले तरी ते ट्रेण्डिंगमध्ये आले आहे. पूजाचे मागचे गाणे ‘सेल्फी मैंने ले ली आज’ तुफान व्हायरल झाले होते. याच गाण्याने तिला इंटरनेटवर लोकप्रिय बनवले. त्यानंतर ती २०१७ साली टीव्हीवरील सर्वात विवादित शो बिग बॉसच्या ११ व्या पर्वत स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. त्यानंतर ती प्रचंड प्रसिद्ध झाली.

पूजाच्या या गाण्यावर सोशल मीडियावरून नेटकऱ्यांकडून भन्नाट मिम्स व्हायरल केले जात आहे. पाहूया असे काही मजेदार मिम्स.

हे मिम्स पाहून तुम्ही देखील तुमचे हसू रोखू शकणार नाही.

 

 

हे देखील वाचा