सध्या बॉलिवूडमध्ये रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्टच्या (Alia Bhatt) लग्नाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे आता या शाही विवाह सोहळ्याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. त्यांच्या घरी आता पाहूण्यांची गर्दी व्हायला सुरूवात झाली आहे. अनेक महिने त्यांच्या प्रेमप्रकरणाची सर्वत्र चर्चा रंगली होती. आता या सगळ्या चर्चांना पूर्णविराम देत दोघेही लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. त्याआधी आलिया भट्टचे वडील दिग्दर्शक महेश भट्ट (Mahesh Bhatt) यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ते फोटो काढणाऱ्या लोकांना फोटोसाठी पैशाचीव मागणी करत आहेत.
दिग्दर्शक महेश भट्ट सध्या लेकीच्या लग्नाच्या जोरदार तयारीत व्यस्त आहेत. सध्या त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ते कपिल शर्माच्या शोच्या सेटबाहेर असलेले दिसत आहेत. महेश भट्ट यांना पाहताच माध्यमांनी आणि कॅमेरावाल्यांनी गर्दी केली. यावेळी महेश भट्ट यांनीही कॅमेरावाल्यांशी संवाद साधला. यावेळी काळ्या रंगाचा टी-शर्ट आणि ट्राउजर घातलेले महेश भट्ट कॅमेऱ्यासमोर जोरदार पोझ देताना दिसत आहेत. ज्यावेळी त्यांना कॅमेरावाल्यांनी सोलो पोझ द्यायला लावली, तेव्हा ते “त्याचे वेगळे पैसे द्यावे लागतील” असे म्हणले. ज्यामुळे सगळेच थक्क झालेले पहायला मिळाले.
दरम्यान आलिया आणि रणबीरचा शाही विवाह सोहळा मुंबईच्या आर.के स्टुडिओमध्ये संपन्न होणार आहे. १३ एप्रिलला मेहंदीचा कार्यक्रम, १४ ला लग्न आणि १८ ला रिसेप्शन असा या लग्नाचा कार्यक्रम पार पडणार आहे. त्याआधीच या शाही विवाह सोहळ्याची सगळीकडे जोरदार चर्चा रंगली आहे. या विवाह सोहळ्यासाठी चित्रपट जगत आणि विविध क्षेत्रातील अनेक प्रतिष्ठित मान्यवरांना आमंत्रित केले जाणार आहे. त्यामुळे बऱ्याच महिन्यांपासून चर्चेत असलेले हे प्रेमप्रकरण, आता लग्नाच्या मंडपात सात फेरे घेऊनच थांबणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-