Saturday, March 15, 2025
Home बॉलीवूड काय सांगता ! म्हणून रणबीर-आलियाने लग्नात ७ नाही तर घेतले ४ फेरे, कारण ऐकून तुम्हीही व्हाल हैराण

काय सांगता ! म्हणून रणबीर-आलियाने लग्नात ७ नाही तर घेतले ४ फेरे, कारण ऐकून तुम्हीही व्हाल हैराण

पाच वर्षांच्या डेटिंगनंतर अखेर १४ एप्रिल रोजी महेश भट्ट यांची मुलगी आलिया भट्ट आणि नीतू कपूर यांचा मुलगा रणबीर कपूर विवाहबंधनात अडकले. रणबीर-आलियाचे चाहते या दिवसाची आतुरतेने वाट पाहत होते आणि १४ एप्रिलला तो क्षण आला आहे. जेव्हा आलिया-रणबीरने आयुष्यभरसाठी एकमेकांचा हात धरला होता. पण तुम्हाला माहित आहे का की, रणबीर आणि आलियाने सात फेरे घेऊन नव्हे तर केवळ चार फेऱ्या घेऊन लग्न केले आहे. होय, तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की आलिया-रणबीरने लग्नाची एक परंपरा बदलली आणि सात फेरे घेतले नाहीत तर फक्त चार फेरे घेतले. आलियाचा भाऊ राहुल भट्टने याबाबत सांगितले आहे, तसेच या जोडप्याने असे करण्यामागचे कारण सांगितले आहे.

माध्यमांशी बोलताना राहुल भट्ट म्हणाला, “रणबीर-आलियाने त्यांच्या लग्नात ७ नव्हे ४ फेऱ्या मारल्या आहेत. त्यांच्या लग्नात खास पंडित होते. हे पंडित अनेक वर्षांपासून कपूर कुटुंबासोबत आहेत. त्यामुळे प्रत्येक फेरीचे महत्त्व त्यांनी सांगितले. एक घडते धर्मासाठी, एक घडते मुलांसाठी. त्यामुळे हे सर्व खरोखरच आकर्षक होते. मी अशा घराचा आहे जिथे अनेक धर्माचे लोक राहतात. रेकॉर्डसाठी ७ फेऱ्या नाहीत, तर ४ फेऱ्या झाल्या आणि चारही फेऱ्यांमध्ये मी तिथे होतो.”

लग्नानंतर आता सर्वांनाच प्रतीक्षा आहे की, रिसेप्शन कधी होणार? लग्नाचे सर्व विधी आटोपल्यानंतर नीतू कपूर यांची मुलगी रिद्धिमा आणि जावई भरत साहनीसोबत मीडियासमोर आली. त्याने पॅपराजीचे आभार मानले आणि आलिया आणि रणबीरवर खूप प्रेम केले. याशिवाय पॅपराजीनी त्याला रिसेप्शनबद्दल विचारले असता, त्याने रिसेप्शन होणार नसल्याचे स्पष्ट केले. उलट तो म्हणाला की, “सगळं झालं आता तू आरामात घरी जाऊन झोपा.” अशाप्रकारे रणबीर आणि आलियाने का चार फेरे घेतले हे तिच्या भावाने स्पष्ट केले आहे. त्यांनी अगदी गुप्तता राखून हे लग्न केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

 

हे देखील वाचा