Friday, March 14, 2025
Home बॉलीवूड दिग्गज गायिका आशा भोसले यांच्या मुलाची तब्येत अचानक बिघडली, दुबईतील रुग्णालयात दाखल

दिग्गज गायिका आशा भोसले यांच्या मुलाची तब्येत अचानक बिघडली, दुबईतील रुग्णालयात दाखल

प्रसिद्ध गायिका आशा भोसले (ASha Bhosale) यांचा मुलगा आनंद भोसलेंच्या (Anand Bhosale)  प्रकृतीबाबत चिंताजनक माहिती समोर आली असून त्याला दुबईमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी चक्कर येऊन पडल्याने त्याला जखम झाली होती. त्यावेळी त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत असून त्याच्यासोबत गायिका आशा भोसलेंनीही दुबईमधेच राहण्याचा निर्णय घेतला आहे. 
याबाबत  संपूर्ण माहिती अशी की, गायिका आशा  भोसले सध्या दुबईमध्ये असून त्यांच्या मुलाला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी आनंद भोसले घरात चक्कर येऊन पडल्याने दुखापत झाली होते. या घटनेनंतर त्यांना तात्काळ दुबईमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रकृती खूपच अत्यावस्थ असल्याने त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. आता त्यांच्या प्रकृतीतबद्दल नवीन अपडेट समोर आली असून त्यांना दुसऱ्या वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आले आहे. यामुळेच आशा भोसले यांनी दुबईमध्येच त्यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे.
या अचानक आलेल्या संकटाने भोसले आणि मंगेशकर फॅमिली खूपच भयभीत झाली असून विविध क्षेत्रातील मान्यवर आनंद भोसले यांच्या प्रकृतीबद्दल फोनवरुन माहिती घेत आहेत. दरम्यान आनंद भोसले हे आशा भोसले यांचे दुसरे चिरंजीव आहेत. आआधी २०१५ मध्ये त्यांच्या हेमंत या मुलाचे कॅंसरने दुःखद निधन झाले होते.
हेही वाचा-

हे देखील वाचा