Wednesday, October 15, 2025
Home टेलिव्हिजन मनोरंजनविश्वातील ‘या’ कलाकारांकडे आहे महागड्या आणि आलिशान वस्तूंचे शानदार कलेक्शन

मनोरंजनविश्वातील ‘या’ कलाकारांकडे आहे महागड्या आणि आलिशान वस्तूंचे शानदार कलेक्शन

कलाकारांचे जीवन नेहमीच लोकांना भुरळ पडत असते. त्यांच्या या शानदार आयुष्याचा हेवा कोणाला पडला नसेल असा व्यक्ती शोधूनही सापडणार नाही. कलाकार आणि त्यांचे आलिशान जीवन नेहमीच सामान्य लोकांना आकर्षित करत असतात. कलाकार आणि त्यांचे चैनीचे जीवन नेहमीच लोकांच्या चर्चेचा विषय असतो. कलाकार नेहमीच त्यांच्या इनकममधून स्वतःसाठी आणि स्वतःच्या कुटुंबासाठी अनेक शानदार वस्तू खरेदी करत असतात. ज्या गोष्टी सामान्यांसाठी स्वप्नवत असतात त्या गोष्टी हे कलाकार अगदी सहज स्वतःसाठी घेताना दिसतात. लाखो, करोडोंच्या या वस्तू पाहून अनेकांना आश्चर्य देखील वाटते. आज या लेखातून अशा कलाकारांबद्दल जाणून घेऊया ज्यांनी स्वतःसाठी अशा लक्झरी गोष्टी खरेदी केल्या आहेत.

हिमांशी खुराणा :
पंजाबी इंडस्ट्रीमधील आघाडीची अभिनेत्री, गायिका आणि मॉडेल असणाऱ्या हिमांशीचे लाखो चाहते आहेत. ती अतिशय शानदार आयुष्य जगते. ‘गुच्ची’ हा तिचा आवडता ब्रँड असून, तिच्याकडे या ब्रँडच्या असंख्य आणि महाग वस्तूंचे शानदार कलेक्शन आहे. तिच्याकडे क्रिश्चियन डायर बॅग असून तिची किंमत तब्ब्ल ४.५ लाख आहे.

तेजस्वी प्रकाश :
टेलिव्हीजन इंडस्ट्रीमधील ओळखीचा चेहरा म्हणून तेजस्वी ओळखली जाते. बिग बॉस १५ जिंकल्यानंतर तर तिच्या लोकप्रियतेत अधिकच वाढ झाली आहे. ती देखील एक शानदार जीवन जगते. नुकतीच तेजस्वीने ९० लाखांची बीएमडब्ल्यू गाडी खरेदी केली आहे.

जस्मिन भसीन :
टीव्ही अभिनेत्री जस्मिन अतिशय शानदार आणि स्टायलिश जीवन जगते. तिला देखील महागड्या गोष्टींचा शौक असून, त्यातही विविध बॅगची चाहती आहे. तिच्याकडे एलवी ब्रँडची १.५ लाखांची बॅग आहे.

मौनी रॉय :
काही महिन्यांपूर्वीच मौनीने तिचा बॉयफ्रेंड असलेल्या सूरज नांबियारसोबत लगीनगाठ बांधली आहे. मौनीला सुरजने व्हॅलेंटाइन डे च्या दिवशी चक्क चार अतिशय महागड्या डायमंडच्या अंगठ्या भेट केल्या आहेत.

करण कुंद्रा :
टेलिव्हिजन विश्वातला हार्टथ्रोब म्हणून करण ओळखला जातो. त्याच्याकडे तर आलिशान फ्लॅटपासून, शानदार, महागड्या गाड्या आणि बाईकचे कलेक्शन आहे. नुकतीच त्याने तब्ब्ल १ कोटींची रेंज रोव्हर कर खरेदी केली आहे.

शिल्पा शेट्टी :
बॉलिवूड आणि टेलिव्हिजन असे दोन्ही क्षेत्र गाजवणाऱ्या शिल्पाकडे काय नाही तिच्याकडे सर्वच गोष्टी असून, तिचे जीवन म्हणजे आलिशान आणि शानदार जीवन आहे. अनेक महागड्या वस्तूंसोबतच शिल्पा चक्क एका खासगी जेटची मालकीण आहे.

नोरा फतेही :
बॉलिवूडची डान्स दिवा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नोराने अगदी कमी काळात स्वतःचे पक्के स्थान या क्षेत्रात निर्माण केले. नोराला ब्रँडेड आणि महागड्या कपड्यांची हौस असून तिच्याकडे गुच्ची, एलवी आदी अनेक महागड्या कपड्यांचे आकर्षक कलेक्शन आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा