हिंदी चित्रपट जगतात असे अनेक अभिनेते आहेत, ज्यांच्या दमदार अभिनयात कोणताही चित्रपट सुपरहिट करण्याची ताकद असते. यामध्ये दिग्गज अभिनेते बोमन इराणी यांचे नाव पहिल्यांदा घेतले जाते. भूमिका कोणतीही असो त्यात प्राण ओतून त्याला जिवंतपणा आणण्याची लकब त्यांच्या अभिनयात आहे. ‘थ्री इडियट्स’मधील कडक प्राचार्य असो किंवा ‘मुन्नाभाई’मधील त्यांची डॉक्टराची भूमिका असो, प्रत्येक भूमिकेत त्यांच्या कसदार अभिनयाची जादू पाहायला मिळते. त्यामुळेच त्यांचे नाव सर्वात प्रतिभावान अभिनेते म्हणून घेतले जाते. शुक्रवारी (दि. 02 डिसेंबर) बोमन इराणींनी त्यांचा 63वा वाढदिवस साजरा केला. त्यानिमित्ताने पाहूया त्यांच्या गाजलेल्या चित्रपटांची आणि भूमिकांची एक खास यादी.
मुन्नाभाई एमबीबीएस (Netflix)
‘मुन्ना भाई एमबीबीएस’ हा राजकुमार हिरानी दिग्दर्शित एक विनोदी चित्रपट आहे, जो 2003 मध्ये प्रदर्शित झाला होता. चित्रपटाची कथा संजय दत्त भोवती फिरते, जो गुंड बनतो. पण त्याच्या वडिलांना त्याला डॉक्टर करायचे आहे. चित्रपटात बोमन इराणी (Boman Irani) एका डॉक्टर आणि वैद्यकीय महाविद्यालयाच्या डीनच्या भूमिकेत दिसत आहेत, जो आपल्या शिस्तीसाठी प्रसिद्ध आहेत. बोमन इराणींशिवाय या चित्रपटात सुनील दत्त, संजय दत्त, अर्शद वारसी, ग्रेसी सिंग यांच्याही मुख्य भूमिका होत्या.
वक्त: रेस अगेन्स्ट टाइम (Zee5)
साल 2005 मध्ये आलेला ‘वक्त – द रेस अगेन्स्ट टाइम’ हा चित्रपट विपुल अमृतलाल शाह यांनी दिग्दर्शित केला होता. या चित्रपटात बोमन इराणी यांनी अतिशय मजेशीर भूमिका साकारली होती. चित्रपटात त्यांनी प्रमुख अभिनेत्री प्रियांका चोप्राच्या वडिलांची भूमिका साकारली होती. या चित्रपटात बोमन इराणी यांच्यासोबत मेगास्टार अमिताभ बच्चन, अभिनेता अक्षय कुमार, शेफाली शाह, प्रियांका चोप्रा इत्यादी कलाकार दिसले होते.
View this post on Instagram
3 इडियट्स (Netflix)
राजकुमार हिरानी यांच्या ब्लॉकबस्टर चित्रपट ‘3 इडियट्स’मध्ये बोमन इराणी एका महत्त्वाच्या आणि वेगळ्या भूमिकेत दिसले होते. 2009 मध्ये आलेल्या चित्रपटात त्यांनी महाविद्यालयाच्या प्राचार्याची भूमिका केली होती. बोमन इराणी या चित्रपटात अतिशय कणखर आणि गर्विष्ठ व्यक्तिरेखा साकारताना दिसले होते. ‘3 इडियट्स’मध्ये बोमन इराणींसोबत अभिनेता आमिर खान, शर्मन जोशी, आर माधवन, अभिनेत्री करीना कपूर हे कलाकार दिसले आहेत.
हाऊसफुल्ल
साल 2010 मध्ये रिलीझ झालेला हा एक कॉमेडी चित्रपट होता. या चित्रपटात बोमन इराणी यांनी बटुक पटेलची भूमिका साकारली होती. अभिनेत्री लारा दत्ताच्या वडिलांच्या भूमिकेला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला होता. हा चित्रपट साजिद खानने दिग्दर्शित केला होता. हाऊसफुल व्यतिरिक्त या चित्रपटाच्या सर्व भागांमध्ये बोमन इराणी दिसले.
जॉली एलएलबी (Disney+Hotstar)
माजी पत्रकार सुभाष कपूर दिग्दर्शित, ‘जॉली एलएलबी’ हा बॉलिवूडमधील सर्वात वास्तववादी चित्रपटांपैकी एक आहे. बोमन इराणी, अर्शद वारसी, सौरभ शुक्ला, अमृता राव यांनी या सिनेमात काम केले आहे. चित्रपटाची कथा जगदीश त्यागी उर्फ जॉली या मेरठमधील वकील असलेल्या व्यक्तीभोवती फिरते. बोमन इराणी या चित्रपटात एका गर्विष्ठ वकिलाच्या भूमिकेत दिसले होते.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
अभिनेत्री स्वरा भास्करचे भारत जाेडाे यात्राला सर्मथन; भाजप म्हणतंय, ‘देशविरोधी मानसिकतेचे…’
काय सांगता! 90 कोटींच्या कर्जात बुडाले होते बीग बी अमिताभ, परेश रावलाने केला मोठा खुलासा