जसजसा काळ पुढे सरकला तसतसे मनोरंजनासाठी वेगवेगळी माध्यमे समोर येऊ लागली. पूर्वी फक्त रेडिओपुरती मर्यादित असणारी ही साधने टेप रेकॉर्डर, सिडी प्लेअर, डीव्हीडी प्लेअर, टीव्ही, आदी गोष्टींपर्यंत वाढली. आज यातही अनेक मोठे बदल झाले आहेत. नाटकं, मालिका, चित्रपट या मुख्य मनोरंजनाच्या साधनांमध्ये आता ओटीटी मध्यम देखील जोडले गेले आहे. आता यातच काही मोबाईल अँपच्या माध्यमातून देखील आपल्याला विविध पुस्तकं ऑडिओ रूपात देखील ऐकायला उपलब्ध आहे. यातच मागील काही काळापासून स्टोरीटेल हे अँप खूपच गाजताना दिसत आहे. या अँपच्या माध्यमातून अनेक मोठे कलाकार त्यांच्या आवाजात काही गोष्टी आपल्याला वाचून दाखवत असतात.
मराठी मनोरंजनविश्वातील प्रभावी आणि आघाडीची अभिनेत्री असेलेली मुक्ता बर्वे देखील या अँपशी जोडल्या गेली आहे. चित्रपट, मालिका आणि नाटक अशा तिन्ही माध्यमांमधून आपल्या अभिनयाचा मोठा प्रभाव प्रेक्षकांवर पडल्यानंतर मुक्ता एका वेगळ्याच भूमिकेतून सर्वांच्या भेटीला आली. स्टोरी टेल या मराठी अँपवर ‘Virus-पुणे’ नावाच्या सीरीजचा दुसरा नवाकोरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणाार आहे. याबाबत माहिती देणारी पोस्ट नुकतीच मुक्ताने शेअर केली आहे. सोशल मीडियावर यासंदर्भात एक व्हिडिओ शेअर करत तिने याबाबतची माहिती दिली आहे.
सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रीय असणाऱ्या मुक्ताने तिच्या इन्स्टाग्रामवर या ‘Virus-पुणे’बद्दल पोस्ट शेअर करताना लिहिले, “एका जीवघेण्या व्हायरसच्या निमित्तानं पुण्यावर एक भयंकर संकट कोसळलंय. सगळं शहर पत्त्यांसारखं उन्मळून पडत असताना नेहाच्या मुलीला मायराला काही अज्ञात लोकांनी किडनॅप केलंय. मायरापर्यंत पोचण्यात, तिचा शोध घेण्यात नेहा, दिव्या, सचिन यशस्वी होतील? न भूतो न भविष्यती अशा या संकटातून ते खरंच बाहेर पडतील? नियतीचा हा जीवघेणा खेळ खरंच संपेल? व्हायरस पुणे season 2. उद्या येतंय.”
काही महिन्यांपूर्वी मुक्ताच्या आवाजात ‘व्हायरस पुणे’ नावाने एक सिरीज आली होती. तिच्या या सिरिजला प्रेक्षकांनी दमदार प्रतिसाद दिला. आता याच सिरीजचा पुढचा भाग येत आहे. त्याच निमित्ताने तिने ही पोस्ट शेअर केली आहे. मुक्ता नेहमीच प्रेक्षकांना काहीतरी नवीन देण्याच्या प्रयत्नात असते आणि यात ती नेहमी यशस्वी होते देखील. आता मुक्ताच्या या पोस्टमुळे तिच्या या आगामी सिरिजबद्दल तिच्या फॅन्समध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा