झी मराठीवरील ‘देवमाणूस’ ही मालिका तुफान गाजली. या मालिकेने अमाप लोकप्रियता मिळवली. म्हणूनच या मालिकेचा दुसरा भाग आला. दुसऱ्या भागाने देखील कमाल करत मालिकेत येणारी ट्विस्ट आणि टर्न्समुळे प्रेक्षकांना खिळवून ठेवले आहे. पूर्वी फक्त चित्रपटांचे पुढचे भाग यायचे. टेलिव्हिजन विश्वात जरी ही सिक्वलची लाट आली असली तरी मराठीमध्ये तशी ती मागील काही वर्षांपासून गाजताना दिसत आहे. अनेक चांगल्या आणि दर्जेदार विषयांवरील मालिकांनी प्रेक्षकांच्या मनात घर केले. अशा मालिकांची लोकप्रियता बघता निर्मात्यांनी त्या मालिकांचे सिक्वल काढले. आता देवमाणूस या मालिकाच देखील सिक्वल सुरु आहे.
देवमाणूस २ या मालिकेला मिळणारा प्रतिसाद आणि प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यासाठी मालिकेत येणारे ट्विस्ट मालिकेबद्दल लोकांच्या मनात कुतूहल निर्माण करत आहे. या मालिकेच्या पहिल्या भागात इन्स्पेक्टर दिव्या सिंग अजितकुमार देवला बेड्या घालून घेऊन जाते. मात्र या पर्वात अजितसिंग मोकाट दिसत आहे. त्याला धाक घालणारे कोणीच नसल्याने तो मोकळा दिसत आहे. मात्र आता याच मोकाट अजितसिंग देवला वेसण घालण्यासाठी एका नवीन पात्राची एन्ट्री मालिकेत होणार आहे.
मार्तंड जामकर असे या नवीन पात्राचे नाव असून हे पात्र प्रसिद्ध अभिनेते मिलिंद शिंदे साकारणार आहे. विविध चित्रपटांमध्ये, मालिकांमध्ये खलनायक रंगवलेले मिलिंद शिंदे पुन्हा मालिकेत दिसणार असल्यामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण. या मालिकेतील त्यांच्या भूमिकेबद्दल ते खूप आनंदात असून त्यांनी या मालिकेतील त्यांच्या भूमिकेबद्दल सांगितले की, “देवमाणूस या लोकप्रिय मालिकेत अजितकुमारची भूमिका दमदार आहे. या दुसऱ्या सिझनमध्ये मार्तंड जामकर ही महत्वपूर्ण भूमिका मला साकारण्याची संधी मिळाल्याने मला खूप आनंद झाला आहे. याआधी देखील प्रेक्षकांना माझ्या सर्व भूमिका आवडल्या असून ही भूमिका देखील त्यांच्या लक्षात राहील अशी मला खात्री आहे.” आता या मालिकेत अजितकुमार आणि मार्तंड यांची जुगलबंदी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
आता या मार्तंडच्या येण्यामुळे मालिकेत काय घडते आणि अजितकुमारचे पाप उघड पडेल की, नाही हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा