Sunday, February 23, 2025
Home बॉलीवूड कियारासोबत ब्रेकअपच्या बातम्यांमध्येच सिद्धार्थ मल्होत्राने शेअर केला नवीन फोटो, कॅप्शनने वेधले सगळ्यांचे लक्ष

कियारासोबत ब्रेकअपच्या बातम्यांमध्येच सिद्धार्थ मल्होत्राने शेअर केला नवीन फोटो, कॅप्शनने वेधले सगळ्यांचे लक्ष

बॉलीवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra)  ​​याने ‘शेरशाह’मध्ये आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली होती आणि या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघांच्यात प्रेम फुलल्याचेही बोलले जात होते. शेरशाहमधील सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी (Kiara Advani)  यांची जोडी चांगलीच पसंतीस उतरली होती. पण, आता कियारा आणि सिद्धार्थ वेगळे झाल्याचे बोलले जात आहे. दोघांनी एकमेकांना भेटणे आणि बोलणे बंद केले आहे. सिद्धार्थ मल्होत्राने इंस्टाग्रामवर स्वत:चा एक फोटो शेअर केला असून त्यावरुनच त्यांच्यात सगळं काही आलबेल नसल्याची चर्चा सुरू झाली आहे.

याबाबत संपूर्ण माहिती अशी की, सध्या सोशल मीडियावर सिद्धार्थ मल्होत्राच्या एका व्हायरल फोटोची चांगलीच चर्चा रंगली आहे. या फोटोमध्ये सिद्धार्थ मल्होत्रा ​​समुद्राच्या मधोमध पोज देताना दिसत आहे. या फोटोमध्ये स्लीव्ड टीशर्ट घातलेला सिद्धार्थ खूपच मनमोहक देखणा दिसत आहे. मात्र या फोटोपेक्षा त्याच्या कॅप्शनचीच सगळीकडे चर्चा रंगली आहे. या व्हायरल फोटोला सिद्धार्थने सुर्यास्ताविना एक दिवस तुम्हीही जाणता असा सुचक कॅप्शन दिला आहे. यावरुनच त्याची ही पोस्ट कियारा अडवाणीसाठी असल्याचे बोलले जात आहे. या फोटोवरुन त्यांचे ब्रेकअपचीच चर्चा रंगली आहे. अनेक यूजर्स फोटोवर कमेंट करत कियारापासून वेगळे होण्यामागचे कारण विचारत आहेत. दुसरीकडे, अनेकांनी त्याच्या जबरदस्त स्टायलिश लूकचे कौतुकही केले आहे.

या वृत्तांवर आतापर्यंत सिद्धार्थ किंवा कियारा यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. याआधीही त्यांच्या प्रेमप्रकरणाच्या बातम्या येत होत्या. त्यावरही दोघांनीही कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. मात्र दोघेही अनेकदा एकत्र फिरताना कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. शेरशाह चित्रपटाच्या यशापासून या दोघांच्याही लवस्टोरीला बहर आल्याची चर्चा सुरू झाली होती. त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली होती. ऑगस्ट २०२१ मध्ये आलेला हा चित्रपट विक्रम बत्रा या शूर सैनिकाच्या जीवनावर आधारित होता.

हे देखील वाचा