‘पटियाला बेब्स’ आणि ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या टीव्ही शोमधून प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या अशनूर कौरने तिच्या १८व्या वाढदिवशी स्वतःला एक आलिशान कार भेट दिली आहे. ३ मेला अशनूर कौरचा वाढदिवस होता. यावेळी कुटुंबीय आणि मित्रांनी अशनूरसाठी खाज सरप्राईजचा प्लॅन केला, तर त्याचवेळी तिने स्वतःला एक कार भेट दिली.
अशनूर कौरचे खूप दिवसांचे स्वप्न होते की, तिला स्वत:साठी एक आकर्षक कार खरेदी करायची आहे. वयाच्या अवघ्या १८व्या वर्षी तिने आपले स्वप्न पूर्ण केले. अशनूरने स्वतः साठी BMWx3 खरेदी केली आणि त्या कारचे फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. (ashnoor kaur gifts herself swanky luxury car of rs 45 lakhs)
सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट
सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये, अशनूर कौर तिच्या नवीन कारसोबत पोझ देताना दिसत आहे. या कारची किंमत सुमारे ४५ लाख रुपये आहे. अशनूरने पोस्टमध्ये सांगितले आहे की, तिच्या बकेट लिस्टमधील ही पहिली गोष्ट होती, जी तिला खरेदी करायची होती. अशनूरने असेही सांगितले की, तिने ही कार स्वतःच्या पैशाने खरेदी केली आहे.
‘या’ महागड्या वस्तूंची मालकीण आहे अशनूर कौर
अशनूर कौरकडे भलेही आता स्वतःच्या पैशाने घेतलेली गाडी असेल, परंतु ती आधीच एक आलिशान जीवन जगते आणि तिला अनेक महागड्या गोष्टींची आवड देखील आहे. तिच्याकडे आधीच मर्सिडीज बेंझ ई क्लासची लक्झरी कार आहे. अशनूर कौरचे मुंबईत एक आलिशान घर आहे, जिथे ती तिच्या आई-वडिलांसोबत राहते. अशनूरने मुंबईतच आणखी एक घर घेतले आहे, ज्याचे काम सुरू आहे. अशनूर कौरने एका मुलाखतीत सांगितले की, तिने आपल्या कष्टाच्या पैशातून हे घर विकत घेतले, जे तिचे स्वप्न होते.
वयाच्या ५व्या वर्षी केले अशनूरने पदार्पण
अशनूर कौरने वयाच्या ५व्या वर्षी बालकलाकार म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यावेळी तिने २००९ च्या टीव्ही शो ‘झांसी की रानी’मध्ये प्राचीची भूमिका केली होती. अशनूर कौर ‘मनमर्जियां’ आणि ‘संजू’ सारख्या चित्रपटांचा देखील भाग राहिली आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा










