मनोरंजनविश्वात अनेक जोड्या रील आणि रियल लाईफ जोड्या तुफान गाजत असतात. मराठी मनोरंजनविश्व देखील त्याला अपवाद नाही. आजच्या घडीला मराठी इंडस्ट्रीमध्ये अशा अनेक रियल लाईफ जोड्या आहेत ज्या प्रेक्षकांमध्ये तुफान लोकप्रिय आहे, अशीच एक जोडी म्हणजे आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कानेटकर यांची. मराठीसोबतच हिंदीमध्ये देखील आपल्या अभिनयाची चुणूक दाखवलेला आदिनाथ सध्या त्याच्या चंद्रमुखी या सिनेमामुळे तुफान गाजत आहे. या सिनेमात त्याची अमृता खानविलकरसोबत असलेली जोडी प्रेक्षकांना चांगलीच भावत आहे. मात्र आज आम्ही तुम्हाला आदिनाथच्या खऱ्या आयुष्यातील चंद्रमुखी असलेल्या उर्मिला कानेटकरबद्दल आणि त्यांच्या लव्हस्टोरीबद्दल सांगणार आहोत.
आदिनाथ आणि उर्मिला ही दोन नाव आज मराठी क्षेत्रातील मोठी नाव म्हणून ओळखली जातात. या दोघांची पहिली भेट आदिनाथच्या घरीच झाली होती. महेश कोठारे त्यावेळी ‘शुभमंगल सावधान’ या त्यांच्या नव्या चित्रपटाच्या तयारीत होते. या चित्रपटासाठी नव्या चेहऱ्याच्या शोधात होते. त्याच कामाच्या निमित्ताने उर्मिला महेश कोठारे यांना भेटायला त्यांच्या घरी गेली होती. तेव्हा आदिनाथ घरीच होता आणि नुकताच झोपेतून उठला होता. त्याने उर्मिलाला समोर पाहिले आणि पाहताच क्षणी तिच्या प्रेमात पडला. पुढे महेश कोठारे यांनी उर्मिलाला नायिका म्हणून निवडले. तो तिचा पहिलाच सिनेमा होता.
‘शुभमंगल सावधान’ या चित्रपटात आदिनाथ कोठारे असिस्टंट डायरेक्टर होता. त्यामुळे सेटवर त्याची नई उर्मिलाची सतत भेट व्हायची. अशातच त्यांची चांगली ओळख झाली, मैत्री आणि हळूहळू मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले. चित्रपट पूर्ण झाल्यावरही त्यांच्या भेटीगाठी चालूच होत्या. पुढे आदिनाथने उर्मिलाला मुंबईत लग्नासाठी मागणी घातली. उर्मिलाने देखील लगेच होकार दिला. दोघांनी अनेक वर्ष एकमेकांना डेट केले आणि त्यानंतर २० डिसेंबर २०११ रोजी त्यांनी लग्न केले. आज मराठी इंडस्ट्रीमधील यशस्वी कपल म्हणून, उत्तम आईबाबा म्हणून आणि नक्कीच उत्तम अभिनेते म्हणून हे दोघं ओळखले जातात. या दोघांना जिजा नावाची गोंडस मुलगी असून तिचे अनेक व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
- Wedding vibes : अभिनेता विराजस कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे अडकले लग्नबंधनात, सोशल मीडियावर आला शुभेच्छांना पूर
- ईदच्या पार्टीत शहनाजने केली सलमानला ओढायला सुरुवात , ही मागणी करताच कारमध्ये बसवून भाईजानने पाठवले परत
- परिणीती चोप्राने ‘हुनरबाज’च्या सेटवर लता मंगेशकर यांचे गाणे गाऊन सर्वांना केले भावूक, व्हिडिओ व्हायरल