Wednesday, March 12, 2025
Home वेबसिरीज ‘या’ इस्त्राईल अभिनेत्याने गायले ‘तेरे जैसा यार कहां’ गाणे, टाळ्यांचा कडकडाट झाले कौतुक

‘या’ इस्त्राईल अभिनेत्याने गायले ‘तेरे जैसा यार कहां’ गाणे, टाळ्यांचा कडकडाट झाले कौतुक

‘फौदा’ (fauda) वेब सीरिजचा अभिनेता त्साही हलेवीने (tyasi halevi) ‘तेरे जैसा यार कहाँ’ हे हिंदी गाणे गायले आहे. इस्त्रायली अभिनेत्याने हे गाणे खूप सुंदर गायले आहे. सोशल मीडियावर गाणे गातानाचा त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला असून त्याला चाहत्यांनी पसंती दिली आहे. हालेवी यांनी पाहुणचाराबद्दल भारताचे आभार मानले. आपल्या देशाच्या ७४ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त हलेवी सध्या नवी दिल्लीत आहेत. भारतातील इस्रायलच्या दूतावासाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात हालेवी यांनी हे गाणे गायले.

त्याचवेळी, प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना हलेवी यांनी सांगितले की, भारत आणि इस्रायलमधील चांगले संबंधांसाठीच्या प्रयत्नांमध्ये ते सहभागी आहेत. अभिनेता म्हणाला, “मला माहित आहे की भारतातील लोक खूप सर्जनशील आहेत. भारताकडे खूप अनुभव आहे. या कार्यक्रमात भारत आणि इस्रायलमधील राजनैतिक संबंधांची ३० वर्षे पूर्ण झाली.”

‘फौदा’ मध्ये इस्रायल-पॅलेस्टिनी संघर्षाची कथा दाखवण्यात आली आहे, ही नेटफ्लिक्स मालिका आहे, जी भारतात खूप आवडली होती. याबाबत ४७ वर्षीय हलेवी म्हणाला , “मला वाटते की फौदा भारतात हिट ठरला आहे. आम्हाला भारतातून सोशल मीडियावर भरपूर प्रतिक्रिया मिळतात. भारतीय टेलिव्हिजनला समजून घेण्याची ही एक उत्तम संधी आहे. कोणताही प्रस्ताव आल्यास त्याला आनंद होईल. कला आणि सिनेमा दोन्ही देशांमधला ‘सेतू’ म्हणून काम करू शकतात.” अशाप्रकारे त्याने या वेब सिरीज मधील त्याचा अनुभव शेअर केला आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

फिनालेच्या काही तास आधी ‘हा’ स्पर्धक झाला कंगना रणौतच्या लॉकअप शोमधून बाहेर

सिनेमात दुसऱ्या इनिंगसाठी मिमोह चक्रवर्ती सज्ज म्हणाला ‘आता हिरोची भूमिका करण्याची गरज नाही’

वाढदिवस विशेष : स्वतः बद्दल खुलासा करणे विकास गुप्ताला पडले महागात, आई आणि भावाने सोडली साथ

हे देखील वाचा