Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

संपुर्ण यादी: बीग बॉसचे आजपर्यंतचे सर्व विजेते; शो नंतर चमकले भाग्य, जीवनात झाले यशस्वी

‘बिग बॉस’ बद्दल प्रेक्षकांमध्ये खूप क्रेझ निर्माण झाली आहे. सुमारे तीन ते चार महिन्यांपर्यंत चालणारा हा शो नेहमीच टीआरपीच्या पहिल्या दहामध्ये स्थान मिळवितो. या शोमध्ये टेलीव्हिजनचे बरेच स्टार्स बोलवले जातात. या कार्यक्रमात कोण भाग घेईल आणि कोण विजयी होईल याबद्दल प्रेक्षकांना नेहमीच उत्सुकता लागलेली असते. आजपर्यंत बिग बॉसने 13 सीझन यशस्वीरीत्या पूर्ण केले आहेत. आज आपण जाणून घेणार आहोत आजपर्यंत बीग बॉसमध्ये जिंकलेल्या विजेत्यांची नावं. A Complete List Of All ‘Bigg Boss’ India Winners Over The Years & What They’re Up To Now.

बिग बॉस 14 (२०२०-२०२१)
बिग बॉस २०२१मध्ये रुबीना दिलैक ही ३३ वर्षीय अभिनेत्री विजेती ठरली. रुबीना ही टीव्ही कलाकार असून तीने गायक राहुल वैद्यला मागे टाकत विजेतेपद मिळवले. एकेवेळी आयएएस बनण्याची स्वप्न पाहणारी रुबीना पुढे कलाकार झाली. तीन टिव्ही इंडस्ट्रीमधून आपले पदार्पण केले. छोटी बहु ही तीने केलेली पहिली मालिका ठरली. सास बिना ससुराल, पुनर विवाह, देवो के देव महादेव, जानी और जुहू या तिच्या गाजलेल्या मालिका आहेत. तीला बीग बॉसमधील विजेतेपदासाठी ३६ लाख रुपये बक्षीस मिळाले होते.

बिग बॉस 13 (२०१९-२०२०)
सिद्धार्थ शुक्ला बिग बॉस सीझन 13 चा विजेता होता. हा शो संपल्यानंतर तो बिग बॉसच्या आणखी एक स्पर्धक शहनाज गिलसह एका म्युझिक व्हिडिओमध्ये दिसला होता. याशिवाय अभिनेत्री नेहा शर्मासोबत सिद्धार्थचा एक म्युझिक व्हिडिओही आला होता. त्याला बीग बॉसमधील विजेतेपदासाठी ३० लाख रुपये बक्षीस मिळाले होते. त्याचे २ सप्टेंबर २०२१ रोजी निधन झाले.

बिग बॉस 12 (२०१८)
दीपिका कक्कड़ सीझन 12 जिंकण्यास यशस्वी झाली होती. बिग बॉसनंतर दीपिका एका नंतर एक मालिकेत व्यस्त होती. मागच्या वर्षाच्या सुरुवातीला ती ‘कहां हम कहां तुम’ या मालिकेत दिसली होती. या व्यतिरिक्त ती बर्‍याच ब्रँड्सचे एन्डोर्स करत असते. तीला बीग बॉसमधील विजेतेपदासाठी ३० लाख रुपये बक्षीस मिळाले होते.

बिग बॉस 11 (२०१७-२०१८)
शिल्पा शिंदे या सीझनमध्ये जिंकली होती. अंतिम फेरीत शिल्पाने हिना खानचा पराभव केला. हा शो जिंकल्यानंतर शिल्पा शिंदेने सुनील ग्रोव्हरसह ‘जिओ धन धना धन’ या कॉमेडी शोमध्ये मोठी धमाल केली. पुढे तीन कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. तीला बीग बॉसमधील विजेतेपदासाठी ५० लाख रुपये बक्षीस मिळाले होते.

बिग बॉस 10 (२०१६-२०१७)
मनवीर गुर्जर हा शो जिंकुन एका रात्रीत स्टार बनला. मनवीरने यानंतर खतरों के खिलाडी या रियालिटी शोमध्येही भाग घेतला. याशिवाय त्याने ‘आज की अयोध्या’ नावाचा चित्रपटही साईन केला होता. त्याला बीग बॉसमधील विजेतेपदासाठी ५० लाख रुपये बक्षीस मिळाले होते.

बिग बॉस 9 (२०१५-२०१६)
प्रिन्स नरुलाला बिग बॉस 9 च्या विजेत्याचे पद मिळाले होते. बिग बॉसच्या आधी त्याने रोडीज, स्प्लिट्सविला शोही जिंकले होते. बिग बॉसनंतर प्रिन्स टीव्ही मालिकांसह रियालिटी शो मध्ये दिसला आहे. त्याला बीग बॉसमधील विजेतेपदासाठी ५० लाख रुपये बक्षीस मिळाले होते.

बिग बॉस 8 (२०१४-२०१५)

गौतम गुलाटीने २०१५मध्ये या शो जे विजेतेपद जिंकले होते. त्यानंतर तो अझहर या सिनेमात दिसला तर २०१९मध्ये ऑपरेशन कोब्रा या ऍरॉस नाऊच्या वेबसिरीजमध्ये तो दिसला.  त्याला बीग बॉसमधील विजेतेपदासाठी ५० लाख रुपये बक्षीस मिळाले होते.

बिग बॉस 7 (२०१३)
गौहर खान सीझन सातची विजेती ठरली. बिग बॉस नंतर गौहर बद्रीनाथ की दुल्हनिया आणि बेगम जान या चित्रपटात दिसली. याशिवाय तिने नागीन, गठबंधन आणि द ऑफिस या टीव्ही कार्यक्रमांमध्येही काम केले. तीला बीग बॉसमधील विजेतेपदासाठी ५० लाख रुपये बक्षीस मिळाले होते.

बिग बॉस 6 (२०१२-२०१३)
कसौटी जिंदगी की या मालिकेत कोमोलिका बनलेली उर्वशी ढोलकिया सीझन सहामध्ये जिंकली. उर्वशीने नवज्योतसिंग सिद्धू, सना खान आणि आश्का गोराडिया यांना मागे सोडले होते. उर्वशी ढोलकिया टीव्हीच्या व्यस्त कलाकारांपैकी एक आहे. सन 2019 मध्ये ती डान्स रिअॅलिटी शो ‘नच बलिये सीझन नाइन’ मध्ये दिसली होती. तीला बीग बॉसमधील विजेतेपदासाठी ५० लाख रुपये बक्षीस मिळाले होते.

बिग बॉस 5 (२०११-२०१२)
जुही परमारने बिग बॉस सीझन पाचची ट्रॉफी जिंकली होती. जुहीने २०११ साली बिग बॉस शो जिंकला आणि त्यानंतर तिने संतोषी मां, कर्मफल दाता शनि आणि तंत्र या मालिकांमध्ये काम केले. तीला बीग बॉसमधील विजेतेपदासाठी १ कोटी रुपये बक्षीस मिळाले होते.

बिग बॉस 4 (२०१०-२०११)
टीव्हीची सूनबाई श्वेता तिवारी हिलाही या रिअॅलिटी शोमध्ये प्रेक्षकांनी पसंती दिली होती. बिग बॉस जिंकल्यानंतर श्वेता सतत कामात व्यस्त दिसली. तिच्या मुख्य मालिकांमध्ये अदालत, सजन रे झूठ मत बोलो, बालवीर, बेगूसराय आणि मेरे डैड की दुल्हन यांचा समावेश आहे. तीला बीग बॉसमधील विजेतेपदासाठी १ कोटी रुपये बक्षीस मिळाले होते.

बिग बॉस 3 (२००९)
विंदू दारा सिंगने बिग बॉस 3 ची ट्रॉफी जिंकली. बिग बॉसचे घर सोडल्यानंतर त्यांनी काही चित्रपट आणि कार्यक्रमांमध्ये काम केले. तो जोकर, हाऊसफुल 2 आणि सन ऑफ सरदार या चित्रपटात काम करताना दिसला. त्याला बीग बॉसमधील विजेतेपदासाठी १ कोटी रुपये बक्षीस मिळाले होते.

बिग बॉस 2 (२००८)
आशुतोष कौशिकने हा सीझन आपल्या नावावर केला. आशुतोषने बिग बॉसपूर्वी एमटीव्ही रोडीजचा पाचवा सीझन जिंकला होता. बिग बॉसनंतर आशुतोष जिला गाजियाबाद, शॉर्टकट रोमियो आणि किस्मत लव पैसा दिल्ली है अशा अनेक चित्रपटांमध्ये दिसला. त्याला बीग बॉसमधील विजेतेपदासाठी १ कोटी रुपये बक्षीस मिळाले होते.

बिग बॉस 1 (२००६-२००७)
राहुल रॉयने बिग बॉसचा पहिला सीझन जिंकला होता. जेव्हा ते भाजपमध्ये दाखल झाले तेव्हा त्यांच्यावर बऱ्याच चर्चा रंगल्या होत्या. त्यांना बीग बॉसमधील विजेतेपदासाठी १ कोटी रुपये बक्षीस मिळाले होते.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-बिग ब्रेकिंग! सिद्धार्थ शुक्लाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

‘बिग बाॅस’ फेम सिद्धार्थ शुक्लाची काय होती शेवटची सोशल मीडिया पोस्ट?

 

हे देखील वाचा