Saturday, January 31, 2026
Home टेलिव्हिजन काय सांगता! तारक मेहता… मालिकेतील मिस्टर अय्यर साऊथ इंडियन नसून आहे महाराष्ट्रीयन जाणून घ्या अभिनेत्याबद्दल

काय सांगता! तारक मेहता… मालिकेतील मिस्टर अय्यर साऊथ इंडियन नसून आहे महाराष्ट्रीयन जाणून घ्या अभिनेत्याबद्दल

मागील १३ वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा आणि त्यांना खळखळून हसवणारा शो म्हणजे ‘तारक मेहता का उलटा चश्मा’. या मालिकेने प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेऊन त्यांच्या हृदयात स्थान निर्माण केले आहे. आजही या शोची प्रेक्षकांमधील क्रेझ यत्किंचितही कमी झालेली नाही. मालिकेतील प्रत्येक पात्र आता लोकांच्या घरातील एक सदस्यच बनले आहे. जेठालाल, दया, भिडे, चाचाजी आदी सर्वच पात्रं या मालिकेमुळे अजरामर झाली. या मालिकेतील असेच एक प्रसिद्ध पात्र म्हणजे मिस्टर अय्यर.

मिस्टर अय्यर या भूमिकेशिवाय तारक मेहता का उलटा चश्मा या मालिकेची कल्पना देखील केली जाऊ शकत नाही. अभिनेता तनुज महाशब्दे ही अय्यरची भूमिका साकारत आहे. मुख्य म्हणजे तनुज महाराष्ट्रीयन असूनही त्याने साऊथ इंडियन असण्याचे जे बेरिंग पकडले आहे ते खरंच स्तुत्य आहे. मालिकेतील त्याचा लूक आणि बोलण्याची स्टाईल प्रचंड हिट झाली आहे. अय्यर आणि बबिता यांची मालिकेतील जोडी तुफान गाजते. दाक्षिणात्य अय्यर आणि बंगाली बबिता अशी अनोखी जोडी प्रेक्षकांना तुफान भावली. या मालिकेत अभिनय करण्यापूर्वी तनुजने मालिकेत सहायक दिग्दर्शक आणि स्क्रिप्ट रायटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. मात्र कालांतराने स्क्रिप्टच्या मागणीनुसार तनुजला अय्यर ही भूमिका ऑफर करण्यात आली.

या भूमिकेबद्दल तनुजने एका मुलाखतीमध्ये सांगितले होते की, “जेव्हा मला मी भूमिका ऑफर झाली तेव्हा माझा विश्वासच बसत नव्हता की, मला एवढ्या सुंदर अभिनतेरीच्या नवऱ्याची भूमिका साकारायची संधी मिळत आहे. मला जेव्हा विचारले तेव्हा तर आधी धक्काच बसला होता. मात्र सर्वानी माझ्यावर दाखवलेला विश्वास मला खूप मदत करून गेला.” आज प्रेक्षकांना मिस्टर अय्यर ही भूमिका साऊथ इंडियनच वाटते. जेव्हा त्यांना समजते की, तनुज महाराष्त्री आहे तेव्हा सर्वानाच धक्का बसतो.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

हे देखील वाचा