Wednesday, October 15, 2025
Home बॉलीवूड …म्हणून राज कुमार यांच्या अंत्यसंस्काराला आला नव्हता एकही बॉलिवूड कलाकार, मेहुल कुमार यांनी केला खुलासा

…म्हणून राज कुमार यांच्या अंत्यसंस्काराला आला नव्हता एकही बॉलिवूड कलाकार, मेहुल कुमार यांनी केला खुलासा

आपण नेहमी म्हणतो की, कलाकारांच्या पडद्यावरील अन् खऱ्या आयुष्यात जमीन आस्मानाचा फरक असतो. पण हिंदी चित्रपटसृष्टी गाजवलेले एक दिग्गज अभिनेते असे होते, ज्यांचा पडद्यावर जितका दरारा होता, तितकाच दरारा त्यांचा खऱ्या आयुष्यातही होता. बोलणं असो, चालणं असो, इंडस्ट्रीत अनेकांशी पंगा घेणं असो किंवा, प्रेक्षकांना आपल्या विनोदबुद्धीनं हसवणं असो… त्यांची शैलीच कमालीची होती. जो ऍटिट्यूड त्यांच्या सिनेमात दिसायचा, तसाच ऍटिट्यूड त्यांच्या खऱ्या खुऱ्या आयुष्यातही होता. ते दिग्गज अभिनेते म्हणजे राज कुमार. (raj kumar) त्यांचा चाहतावर्ग कमालीची होता. पण जेव्हा त्यांचं निधन झालं, तेव्हा त्यांच्या निधनाला एकही बॉलिवूड कलाकार गेला नाही. मग आता तुम्ही म्हणाल का? यामागे कारण होतं खुद्द राज कुमार…

तर यामागचं कारण सांगितलं होतं दिग्दर्शक मेहूल कुमार (mehul kumar) यांनी. मेहूल यांनी राज कुमारांसोबत तिरंगासारख्या सिनेमात काम केलेलं. त्यांनी एका मुलाखतीत सांगितलेलं की, ते राज कुमारांसोबत ‘मरते दम तक’ या चित्रपटात काम करत होते. याच चित्रपटात त्यांच्या निधनाचा सीन आहे. ज्यात राज कुमारांचा मृतदेह एका गाडीत टाकून नेला जातो. सीनच्या तयारीदरम्यान मेहूल यांनी राज कुमारांवर एक फुलांचा हारही टाकलेला. जेणेकरून सीन खरा खुरा वाटेल. आपल्या डायलॉग्जसाठी प्रसिद्ध असलेल्या राज कुमारांनीही मेहूल यांना एक डायलॉग मारलेला. ते म्हणाले होते, ‘जानी अभी पेहना दो…जब असली में मरेंगे ना तब मौका नहीं मिलेगा.’ त्यावेळी मेहूल कुमार काही बोलले नाहीत. हा सीन चित्रपटात टाकण्यात आला. मात्र, जेव्हा शूट संपलं. तेव्हा मेहूल यांनी राज कुमारांना याचं कारण विचारलं.

ते म्हणाले, तुम्ही असं का म्हणालात की, जेव्हा खरंच मरेल, तेव्हा कुणीही नसेल. त्याचवेळी राज कुमारांनी सांगितलं की, माझी अशी इच्छा आहे की, जेव्हा मी मरेल, तेव्हा बॉलिवूड किंवा मीडियातील कोणतीही व्यक्ती माझ्या अंत्य यात्रेला येऊ नये. आपल्या अस्सल अभिनयासाठी ओळखले जाणाऱ्या राज कुमारांनी म्हटलेलं की, जेव्हा मी मरेल, तेव्हा हेच लोक माझ्या मरणाचाही तमाशा बनवतील. स्मशानाला एखाद्या फिल्मी सेटसारखं बनवतील आणि पांढरी कपडे घालून मीडियासमोर फोटो आणि व्हिडिओ देतील. आणि अशाप्रकारे एखाद्या मेलेल्या माणसाला सन्मान देण्याऐवजी त्याच्या मरणाचा तमाशा बनवला जातो.

पुढे त्यांनी सांगितलेलं की, त्यांचा मृत्यू हा त्यांचा कौटुंबिक प्रश्न असेल. फिल्म इंडस्ट्रीतून कुणीही येणार नाही. त्यात केवळ माझ्या कुटुंबातील लोकं असतील. मेहूल यांनी सांगितलं की, राज कुमारांनी हे खऱ्या आयुष्यात सिद्ध करून दाखवलं. त्यांचं निधन कधी झालं, त्यांच्या मृतदेहाला अग्नी कधी दिली, केव्हा त्यांची अंत्ययात्रा निघाली, याबाबत इंडस्ट्रीतील कुणालाही कळलंच नाही.

खरं तर त्यांचं निधन हे कॅन्सरमुळं झालं होतं. तब्बल २ वर्षे ते बेडवर झोपूनच होते. इतके वर्षे कॅन्सरशी झुंज दिल्यांनतर त्यांनी ३ जुलै, १९९६ साली या जगाचा निरोप घेतला होता.राज कुमारांच्या इच्छेनुसार, त्यांचा मुलगा पुरू राज कुमारने या गोष्टीची काळजी घेतली की, आपल्या वडिलांची अंत्ययात्रा, त्यांचं अंत्यसंस्कार हे अगदी खासगीरीत्या होईल, इंडस्ट्रीतील कोणीही सामील होणार नाही.

अशाप्रकारे रुपेरी पडद्यावर सर्वांचे मनोरंजन करणाऱ्या राज कुमारांनी आपल्या मरणाचा तमाशा होऊ दिला नाही. यावरूनच समजतं की, ते किती वेगळे अभिनेते होते. कदाचित त्यांच्यासारखा ऍटिट्यूड कुणाकडंही नसेल. त्यांच्यासारखं कुणी नव्हतं, आणि कुणी बनणारही नाही. आज अनेकजण दिग्दर्शक, निर्मात्यांना उलट उत्तरं देण्यासही घाबरतात. कारण, त्यांच्या करिअरची वाट लागेल म्हणून… पण राज कुमार तर त्यावेळी कुणालाही सोडत नव्हते. ते सहकलाकारांपासून ते निर्मात्यांपर्यंत सर्वांना टोला लावायचे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

हे देखील वाचा