बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी हॉलिवूडमध्ये त्यांच्या अभिनयाची छाप सोडली आहे. आता यात अजून एका मोठ्या अभिनेत्रींचे नाव सामील झाले आहे, आणि ती म्हणजे आलिया भट्ट. बॉलिवूडची बबली गर्ल म्हणून प्रसिद्ध असणारी आलिया आता लवकरच हॉलीवूडपटात आपल्या दमदार अभिनयाचे कौशल्य दाखवताना दिसणार आहे. मागील काही दिवसांपासूनच आलिया हॉलिवूडच्या चित्रपटात दिसणार असल्याच्या बऱ्याच बातम्या मीडियामध्ये येत होत्या. मात्र आता खुद्द आलियानेच याबद्दल पुष्टी केली आहे.
नुकतीच आलिया भट्टने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून तिचा एक फोटो शेअर करत ती हॉलिवूड चित्रपटाच्या शूटिंगसाठी जास्त असल्याचे सांगितले आहे. आलियाने तिचा एक सेल्फी पोस्ट केला असून, त्याच्यासोबत कॅप्शनमध्ये लिहिले की, “मी माझ्या पहिल्यावहिल्या हॉलिवूड चित्रपटाच्या शूटिंगसाठी जात आहे. मला वाटत आहे की, मी पुन्हा नव्याने या इंडस्ट्रीमध्ये आली आहे. खूपच नर्वस आहे.” आलियाच्या या पोस्टवर तिचे फॅन्स आणि नेटकरी कमेंट्स करत तिचे मनोबल वाढवत असून तिला या नवीन सिनेमासाठी शुभेच्छा देत आहेत.
सध्या आलिया तुफान चर्चेत आहे महिन्याभरापूर्वी आलियाने बॉलिवूडचा हँडसम अभिनेता रणबीर कपूरसोबत लग्न करत सर्वांना सुखद धक्का दिला. त्यानंतर लगेचच ती तिच्या कामावर परतली आणि तिने करण जोहरच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले. आता ती लगेच तिच्या हॉलिवूड चित्रपटाच्या शूटिंगसाठी निघाली आहे. तर दुसरीकडे रणबीर कपूर देखील त्याच्या आगामी ‘एनिमल’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.
आलिया भट्टच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, ती लवकरच रणबीर कपूरसोबत अयान मुखर्जीच्या ‘ब्रह्मास्त्र’ सिनेमात दिसणार आहे. यानंतर रणवीर सिंगसोबत ती ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ सिनेमात दिसेल. यासोबतच आलिया भट्ट तिच्या होम प्रॉडक्शनच्या ‘डार्लिंग्स’ चित्रपटात देखील दिसेल.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-