Sunday, February 23, 2025
Home बॉलीवूड ‘तुझ्यापासून दूर राहणे खूप कठीण आहे’, म्हणत अनिल कपूरने पत्नी सुनीताला दिल्या लग्नच्या वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा

‘तुझ्यापासून दूर राहणे खूप कठीण आहे’, म्हणत अनिल कपूरने पत्नी सुनीताला दिल्या लग्नच्या वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा

बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर (Anil Kapoor) सध्या दिग्दर्शक राज मेहता यांच्या ‘जुग जुग जिओ’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. आपल्या प्रोफेशनल लाइफमध्ये चर्चेत असण्यासोबतच अनिल कपूर त्याच्या वैयक्तिक आयुष्यासाठी देखील चर्चेत असतो. गुरूवार (१९ मे) अनिल कपूर आणि सुनीता कपूरच्या लग्नाचा वाढदिवस आहे. या खास दिवशी सुनीता आणि अनिल एकाच शहरात नसले तरी अनिलने हा दिवस खास बनवण्यासाठी आपल्या पत्नीसाठी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली आहे. ज्यामधूव त्यांचे पत्नीबद्दलचे प्रेम दिसत आहे. सध्या अनिल कपूरने आपल्या पत्नीसाठी लिहलेल्या या खास पोस्टची सर्वत्र चर्चा रंगली आहे. 

अनिल कपूरने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर सुनीतासोबतचे काही जुने फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत अनिल कपूरने पहिल्यांदाच या खास दिवशी सुनितापासून दूर राहणे त्याच्यासाठी किती कठीण आहे. याचा उल्लेख या पत्रात केला आहे. अनिल कपूरने लिहले की “माझ्या आयुष्य असणाऱ्या सुनीत कपूरला वाढदिवसाच्या शुभेच्छा. प्रत्येकाला आपल्या सर्वांसारखे प्रेम जगण्याची संधी मिळावी अशी माझी इच्छा आहे. मी खूप भाग्यवान आहे की प्रत्येक वर्षी मी माझे आयुष्य तुमच्यासोबत घालवतो आणि तरुण होतो. तीन खूप छान, प्रेमळ, स्वतंत्र आणि पूर्णपणे वेडी मूली दिल्याबद्दल धन्यवाद. तू माझ्या हृदयात आणि घरातही आहेस. 38 वर्षांत पहिल्यांदाच तुझ्यापासून दूर राहणे खूप कठीण आहे आणि मी दिवस, मिनिटे आणि सेकंद मोजत आहे. आपण तुझ्या आवडत्या ठिकाणी पुन्हा भेटू.”

अनिल कपूरच्या या पोस्टवर चाहत्यांसोबतच इंडस्ट्रीतील अनेक बड्या व्यक्ती कमेंट करत आहेत. कमेंट करणाऱ्या या लोकांमध्ये हॉलिवूड स्टार जेरेमी रेनरचाही समावेश आहे. अनिलच्या पोस्टच्या कमेंट सेक्शनमध्ये त्याने हार्ट इमोजीसह कमेंट केली आहे. अभिनेता अनिल कपूर सध्या त्याच्यासोबत राजस्थानमध्ये शूटिंग करत आहे आणि त्यामुळेच तो सुनितासोबत नाही. दरम्यान अनिल शेवटचा मुलगा हर्षवर्धन कपूरसोबत ‘थार’ चित्रपटात काम करताना दिसला होता. अनिल कपूर लवकरच ‘जुग जुग जिओ’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत वरुण धवन, कियारा अडवाणी आणि नीतू कपूर मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपट यावर्षी 24 जूनला रिलीज होणार आहे.

हे देखील वाचा