Sunday, February 23, 2025
Home अन्य विवाहित सौरव गांगुलीवर जडला होता अभिनेत्री नगमाचा जीव, नाट्यमय पद्धतीने झाला नात्याचा शेवट

विवाहित सौरव गांगुलीवर जडला होता अभिनेत्री नगमाचा जीव, नाट्यमय पद्धतीने झाला नात्याचा शेवट

बॉलिवूड आणि क्रिकेटर्स यांचे खूपच जुने आणि खोल नाते आहे. आजपर्यंत अनेक बॉलिवूड अभिनेत्रींनी क्रिकेटर्सला डेट केले असून काही जोड्यांचे तर लग्न देखील झाले. मात्र असे देखील अनेक कपल आहेत ज्यांचे अफेयर तर खूपच गाजले मात्र त्यांचे नाते लग्नापर्यंत पोहचू शकले नाही. अशीच एक जोडी म्हणजे सौरव गांगुली आणि नगमा. त्यांचे नाते पुढे सरकत असतानाच अचानक त्यांचे ब्रेकअप झाले. नगमा काही वर्षांपूर्वी एक मुलाखतीमध्ये तिच्या आणि सौरवच्या नात्यावर भाष्य केले होते.

नगमाने १९९० साली सलमान खानसोबत ‘बागी: ए रिबैल फॉर लव’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. हा सिनेमा तुफान हिट झाला आणि नगमा बॉलिवूडमध्ये लोकप्रिय झाली. तिच्याकडे अनेक सिनेमांच्या ऑफर यायला सुरुवात झाली. १९९९ पर्यंत तिने तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे अमाप प्रसिद्धी मिळवली. नगमाचे नाव सौरव गांगुलीसोबत जोडले जाऊ लागले. दोघांची भेट १९९९ साली वर्ल्डकपच्या वेळेस झाली. त्यानंतर त्यांना अनेकदा एकत्र स्पॉट केले गेले. दोघं एकमेकांसोबत खूप वेळ घालवायचे सौरव विवाहित असूनही तो नगमाकडे आकर्षित झाला.

एक त्यांना मंदिरात जाताना मीडियाने पाहिले आणि त्यांनी लग्न केल्याच्या अफवा पसरायला लागल्या. या सर्व बातम्यांमुळे सौरवचे लग्न प्रभावित होऊ लागले. सौरवने त्याच्या कुटुंबाच्या विरोधात जाऊन १९९७ साली डोनासोबत लग्न केले होते. या बातम्यांमुळे डोना खूपच त्रासली आणि तिने सौरवला घटस्फोट देण्याचे सांगितले. त्यानंतर सौरवने त्याचे लग्न सांभाळले आणि त्याच्या आणि नगमाच्या अफेयरच्या बातम्यांना नकार दिला.

सध्या नगमा बॉलिवूडपासून लांब राजकारणात सक्रिय झाली असून, तिने २००४ साली काँग्रेसमध्ये प्रवेश केला, नगमाने तिच्या करिअरमध्ये हिंदीसोबतच भोजपुरी,तमिल आणि तेलुगू भाषांमधील चित्रपटांमध्ये काम केले आहे.

 

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा