Thursday, December 12, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘ही अडकलीये? की हिलाच अडकवलंय?’ ‘रानबाजार’मुळे चर्चेत आलेल्या तेजस्विनी पंडितची पोस्ट होतेय व्हायरल

मराठी चित्रपट जगतात सध्या ‘रानबाजार’ या वेबसिरीजची चांगलीच चर्चा पाहायला मिळत आहे. या सिरीजचा पहिला टीझर समोर आल्यापासून अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajkta Mali) आणि तेजस्विनी पंडितच्या (Tejaswini Pandit) बोल्ड अभिनयाने सर्वांचीच झोप उडवली होती. या अभिनेत्यांच्या बोल्ड भूमिका या वेबसिरीजमध्ये दाखवण्यात आल्या आहेत.त्यांच्या या भूमिकांमुळे दोघींना ट्रोलही करण्यात आले होते. या सिरीजमधील अभिनेत्री तेजस्विनी पंडितची सोशल मीडिया पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. काय आहे हे प्रकरण चला जाणून घेऊ. 

सध्या सर्वत्र दिग्दर्शक अभिजीत पानसे यांच्या ‘रानबाजार’ या वेबसिरीजची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. नुकतीच ही वेबसिरीज प्रदर्शित झाली. पॉलिटीकल क्राईम थ्रिलरवर आधारित असणाऱ्या या सिरीजमध्ये अभिनेत्री प्राजक्ता माळी आणि तेजस्विनी पंडितच्या बोल्ड भूमिकांनी सर्वांनाच हादरवून सोडले होते. सत्य घटनेवर आधारित अशी ही वेबसिरीज असल्याचे निर्मात्यांकडून सांगण्यात आले आहे. या सिरीजमधील बोल्डलूकमुळे अभिनेत्री तेजस्विनी पंडितला जोरदार ट्रोल करण्यात आले होते. याच पार्श्वभूमीवर सध्या तिची एक सोशल मीडिया पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे.

आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन तिने ही पोस्ट केली आहे ज्यामध्ये तिने “खेळ कोण खेळतंय? ही अडकलीये? की हिलाच अडकवलंय?” असा कॅप्शन देत तेजस्विनीने रानबाजारचा पोस्टर शेअर केला आहे. सध्या तिची ही पोस्ट चांगलीच व्हायरल होताना दिसत आहे, त्याचबरोबर बोल्ड भूमिकेमुळे ट्रोल करणाऱ्यांनाही तेजस्विनीने सडेतोड उत्तर देत “मी अशा ट्रोलिंगकडे  लक्ष देत नाही, ट्रेलरवरुन काही लोकांनी मला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यामध्ये काहीही निगेटिव्ह नव्हते लोकांनी ते जास्त निगेटिव्ह घेतले” असे मत व्यक्त केले होते. तेजस्विनी प्रमाणेच अभिनेत्री प्राजक्ता माळीलाही नेटकऱ्यांनी ट्रोल केले होते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा