कियारा अडवाणीने फारच कमी वेळात बॉलिवूडमध्ये स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. तिचे सिनेमे बॉक्स ऑफिसवर धमाका तर करतातच, शिवाय कियारा तिच्या फॅशन आणि स्टाइलने सोशल मीडियावर आग लावते. धोनी सिनेमातून खऱ्या अर्थाने तिने यशाची चव चाखली आणि कबीरसिंग सिनेमाने तिला प्रचंड लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळवून दिली. आज कियारा टॉप अभिनेत्रींच्या यादीमध्ये गणली जाते.
कियारा सोशल मीडियावर देखील खूप सक्रिय आहे. लाखो फॅन्स तिला इंस्टाग्रामवर फॉलो करतात. कियारा देखील तिचे अनेक व्हिडिओ, फोटो आणि अपडेट्स फॅन्ससोबत शेयर करताना दिसते. कियाराने नुकताच तिचा एक व्हिडिओ सोशल मीडिया अकांऊटवर पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ तिच्या फोटोशूटच्या वेळेचा असून यात ती अतिशय आत्मविश्वासाने आणि साकारत्मकतेने पोज देताना दिसत आहे. काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये कियारा खूपच आकर्षक दिसत असून तिचा नेकलेस लक्ष वेधून घेत आहे. कियाराचे एक्सप्रेशन पाहून फॅन्स तिचे कौतुक करत आहेत.
The larger than life untold true story of Captain Vikram Batra (PVC) is ready to be unravelled on the big screens. We’re honoured to be showing this journey – #Shershaah in cinemas on 2nd July, 2021, starring Sidharth Malhotra & Kiara Advani. Directed by Vishnu Varadhan. pic.twitter.com/B0xFOronlY
— Karan Johar (@karanjohar) February 20, 2021
लवकरच कियारा सिद्धार्थ मल्होत्रासोबत ‘शेरशाह’ या आगामी सिनेमात दिसणार आहे. तिने या सिनेमाचे पोस्टर आणि प्रदर्शनाची तारीख सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. ‘शेरशाह’ सिनेमा २ जुलै २०२१ रोजी रिलीज होणार आहे. यासोबतच ती कार्तिक आर्यन सोबत ‘भूलभुलैया २’ मध्ये देखील दिसणार आहे. कियाराचं मागच्यावर्षी अक्षय कुमार सोबत ‘लक्ष्मी’ हा सिनेमा प्रदर्शित झाला होता.