अभिनेत्री जेनिफर विंगेटने (Jennifer Winget) आतापर्यंत टीव्ही जगतात अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. मात्र, मालिका ‘बेहद’मधील मायाच्या ग्रे शेड कॅरेक्टरने तिला खूप लोकप्रियता मिळाली. सध्या ती कोणत्याही शोमध्ये दिसत नसली, तरी लवकरच तिचा नवीन शो सुरू होऊ शकतो. खुद्द जेनिफर विंगेटने ही माहिती दिली आहे. ती तिच्या चाहत्यांना सरप्राईज देण्यासाठी तयार आहे.
चाहत्यांसाठी सरप्राईज घेऊन येतेय जेनिफर विंगेट
जेनिफर विंगेटने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक छोटी व्हिडिओ क्लिप शेअर केली आहे. ज्यामध्ये ती तिच्या आगामी प्रोजेक्टबद्दल खूप उत्सुक दिसत आहे. तसेच, ती जुन्या शोमधून परत येऊ शकते, याचा अंदाज तिच्या बोलण्यातून लावता येतो. कारण व्हिडिओच्या शेवटी असे ऐकू येते की, ‘तुमचा आवडता कोर क्रॅकर शेवटी परत आला आहे.’ (jennifer winget can make some special announcement fans guess it)
‘या’ सिरीजच्या दुसऱ्या सीझनमधून करू शकते पुनरागमन
जेनिफरची ही सरप्राईज पोस्ट पाहिल्यानंतर चाहत्यांची उत्कंठा वाढली असून, चाहते पोस्टवर तिच्या एकामागून एक कमेंट करत आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसत आहेत. बहुतेक युजर्स असा अंदाज लावत आहेत की, जेनिफर ‘कोड एम सीझन २’ सह पुनरागमन करू शकते.
जेनिफरबद्दल सांगायचे झाले, तर तिने टीव्हीच्या जगात खूप नाव कमावले आहे आणि त्यानंतर अभिनेत्रीने ‘कोड एम’ या वेब सीरिजद्वारे डिजिटल पदार्पण केले. जेनिफरची ही वेब सिरीज Zee5 आणि Alt Balaji वर रिलीज झाली. सध्या प्रेक्षकही याच्या दुसऱ्या सीजनची वाट पाहत आहेत.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
- मल्टीकलर स्विमसूटमध्ये बोल्ड अंदाजात दिसली प्रसिद्ध अभिनेत्री जेनिफर विंगेट; पाठीवरील टॅटूने वेधले नेटकऱ्यांचे लक्ष
- असे काही कलाकार ज्यांनी समाजाचा विचार न करता मारल्या होत्या एकमेकांच्या कानशिलात
- ऐश्वर्या रायसोबत दिसणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीला ओळखले का? आज आहे टेलिव्हिजन विश्वातील सर्वात महाग अभिनेत्री