Thursday, December 4, 2025
Home अन्य आयुष्यातील खास व्यक्तीच्या आठवणीत सायली संजीवने बनवली खास गोष्ट, फोटो होतोय व्हायरल

आयुष्यातील खास व्यक्तीच्या आठवणीत सायली संजीवने बनवली खास गोष्ट, फोटो होतोय व्हायरल

सायली संजीव (Sayali Sanjeev) ही मराठी सिनेजगतातील एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. आपल्या दमदार अभिनयाने आणि सोज्वळ सौंदर्याने तिने स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. सायली तिच्या भूमिकांसाठी घेतलेली मेहनत आणि तिचा कसदार अभिनयासाठी सर्वात जास्त लोकप्रिय आहे. सायली संजीव सोशल मीडियावरही नेहमी सक्रिय असते. सध्या तिची एक भावूक पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. ज्याची सर्वत्र चर्चा रंगली आहे. कोणती आहे ती पोस्ट चला जाणून घेऊ. 

अभिनेत्री सायली संजीव छोट्या पडद्यावर चांगलीच लोकप्रिय आहे. ‘काहे दिया परदेस’ या मालिकेतून ती घराघरात पोहोचली होती. या मालिकेतील तिच्या अभिनयाचे जोरदार कौतुक झाले होते. अभिनेत्री सायली संजीव सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. सायली आपल्या अभिनयासाठी जितकी प्रसिद्ध आहे. तितकीच ती तिच्या हळव्या स्वभावासाठीही प्रसिद्ध आहे.  सध्या तिची एक भावूक पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. ही पोस्ट तिने तिच्या वडिलांसाठी लिहली आहे. वडिलांची गोड आठवण सांगताना सायलीने ही पोस्ट लिहली आहे.

आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन सायलीने एका अंगठीचा फोटो शेअर केला आहे. या फोटोसोबत तिने “बाबा कायम माझ्यासोबत माझ्याजवळ असावे म्हणून त्यांनी वापरलेल्या अंगठीची मी ही अंगठी माझ्यासाठी करून घेतली. आज बरोबर ६ महिने झाले त्यांना जाऊन, I love you बाबा,”असा कॅप्शन देत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. सायलीच्या या पोस्टवर तिच्या चाहत्यांनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत.सायलीच्या या भावूक पोस्टची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.दरम्यान अभिनेत्री सायली संजीवने ‘काहे दिया परदेस’, ‘परफेक्ट पती’, अशा मालिकांमध्ये तर ‘झिम्मा’, ‘आटपाडी नाइट्स’, ‘गोष्ट एका पैठणीची’ सारख्या गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा