Thursday, August 7, 2025
Home बॉलीवूड आपल्या जीजूंच्या पहिल्याच सिनेमात सलमानने दिली होती अफगाणी अभिनेत्रीला संधी, आज ‘ती’ झालीय बॉलीवूडमधील स्टार कलाकार

आपल्या जीजूंच्या पहिल्याच सिनेमात सलमानने दिली होती अफगाणी अभिनेत्रीला संधी, आज ‘ती’ झालीय बॉलीवूडमधील स्टार कलाकार

तुम्हाला ‘लव्हयात्री’ हा सिनेमा आणि या सिनेमातील मुख्य अभिनेत्री वरीना हुसैन सुद्धा आठवत असेलच. लक्षवेधक डोळे असणारी वरीना पहिल्याच सिनेमात भाव खाऊन गेली. या सिनेमाने जरी सरासरी बिझनेस केला असला, तरी वरीनाने मात्र चांगलीच प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळवली. आज वरीना तिचा बावीसावा वाढदिवस साजरा करत आहे. वरीनाचा जन्म २३ फेब्रुवारी १९९९ ला अफगाणिस्तानमधल्या काबुल येथे झाला.

वरीनाचे वडील इराणी तर आई अफगाणी होती. तिला बालपणापासून अभिनेत्री होण्याची खूप इच्छा होती. तिने भारतामध्ये स्थायिक होण्याआधी तिने अनेक देशांचा प्रवास केला. त्यानंतर ती २०१३ साली दिल्लीमध्ये आली, आणि तिथून तिने तिच्या मॉडेलिंग करियरला सुरुवात केली. वरीनाने काही जाहिरातींमध्ये देखील काम केले. तिची कॅडबरीची जाहिरात प्रचंड गाजली होती.

वरीनाने सलमान खानच्या लव्हयात्री या सिनेमातून अभिनयाच्या जगात पाऊल टाकले. सलमान खानने या सिनेमाची निर्मिती करत अर्पिता खानचा नवरा अभिनेता आयुष्य शर्माला लाँच केले होते. यासोबतच त्याने याच सिनेमातून वरीना हुसैनला देखील लाँच केले. सलमानला लव्हयात्री सिनेमासाठी एका नव्या चेहेऱ्याचा शोध होता, त्याने वरीनाला पाहिले आणि लगेच तिला या सिनेमाची ऑफर दिली.

सलमानने याबाबतचे एक मजेशीर ट्विट देखील केले होते. त्याने त्यात लिहिले की, ” अखेर मला मुलगी मिळाली.” त्याचे हे ट्विट खूप व्हायरल झाले. लोकांना वाटले की, सलमान आता लग्न करणारच, मात्र काही दिवसांनी समजले की, सलमानला त्याच्या नवीन सिनेमातही मुख्य नायिका मिळाली आहे. या भूमिकेसाठी देशभरात अनेक ऑडिशन घेतले गेले होते, यातूनच वरीनाची निवड केली गेली.

वरीनाने अभिनयात येण्यापूर्वी न्यूयॉर्क फिल्म अकॅडमी मधून शिक्षण घेतले. त्यानंतर तिने अभिनयात नशीब अजमावायला सुरुवात केली. तिने करियरच्या सुरुवातीलाच सलमान खानसोबत देखील काम केले. दबंग ३ सिनेमात तिने ‘मुन्ना बदनाम’ या गाण्यावर सलमानसोबत डान्स केला आहे.

सध्या वरीनाने तिचा मोर्चा साऊथ सिनेसृष्टीकडे वळवला आहे. तिला साऊथमध्ये सिनेमा देखील मिळाला असून, लवकरच या सिनेमाची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. वरीना हळूहळू या इंडस्ट्रीमध्ये तिचा जम बसवत असून, तिची क्रेझ फॅन्समध्ये जबरदस्त वाढत आहे. सोशल मीडियावर लोकप्रिय असणारी वरीना तिच्या फॅशन सेन्ससाठी सुद्धा ओळखली जाते. अनेक तरुणी तिच्या फॅशन फॉलो करताना सुद्धा दिसतात.

हे देखील वाचा