Monday, October 13, 2025
Home बॉलीवूड Kk Death | युजरने केली बादशाहाच्या मरणाची प्रार्थना, रॅपरने ‘या’ शब्दात दिलं उत्तर

Kk Death | युजरने केली बादशाहाच्या मरणाची प्रार्थना, रॅपरने ‘या’ शब्दात दिलं उत्तर

प्रसिद्ध बॉलिवूड गायक केके (KK) यांचे ३१ मे रोजी निधन झाले. २ मे रोजी सर्वांनी पाणावलेल्या डोळ्यांनी केकेचा निरोप घेतला. प्रसिद्ध पार्श्वगायक केके यांच्या अचानक जाण्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. सोशल मीडियावर सर्वांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. गायक बादशाहनेही (Badshah) केकेचे स्मरण करून त्यांना श्रद्धांजली वाहिली. मात्र त्यानंतर त्याला ट्रोल व्हावे लागले. त्याचवेळी बादशाहनेही ट्रोल करणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे.

खरं तर, बादशाहने इंस्टा स्टोरीवर गायक केकेचा एक फोटो शेअर करून आपले दुःख व्यक्त केले. रॅपरने ‘why…?’ लिहीत हृदय तोडणारे इमोजीही पोस्ट केले. मात्र काही युजर्सना बादशाहची ही स्टोरी पचली नाही. गायक केकेबद्दल बादशाहची ही पोस्ट पाहून यूजर्स त्याला ट्रोल करायला लागले. कारण बादशाहने केकेला सोशल मीडियावर फॉलो केले नाही. (badshah gave a befitting reply to the trollers for hate massage)

बादशहाने दिले सडेतोड उत्तर
सोशल मीडियावर एका युजरने बादशाहवर अपमानास्पद कमेंट लिहिली, “तू कधी मरशील?” युजरची ही गोष्ट गायकाला खूप वाईट वाटली. पण बादशाहनेही या युजरला चोख प्रत्युत्तर दिले. बादशाहने आपल्या इन्स्टा स्टोरीवर या यूजरचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. त्याने या युजरला सडेतोड उत्तर दिले आणि लिहिले, “तुम्ही जे पाहत आहात ते भ्रम आहे. तुम्ही जे ऐकत आहात ते खोटे आहे. काही लोक तुम्हाला भेटण्याची तळमळ करतात, तर काही तुमच्या मृत्यूसाठी प्रार्थना करतात.” मात्र बादशाहने या युजरचे नाव उघड केलेले नाही.

यासोबतच त्याने स्क्रीनशॉट शेअर करताना सांगितले की, हे फक्त सांगण्यासाठी आहे की, रोजच्या जीवनात त्यांना कशा गोष्टींचा सामना करावा लागतो. वर्क फ्रंटवर, बादशाह सध्या त्याच्या नवीन प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा