बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे (Sonali Bendre) अनेक वर्षांनंतर पडद्यावर परतली आहे. तिने ‘द ब्रोकन न्यूज’ या वेब सीरिजमधून ओटीटी पदार्पण केले, ज्यामुळे ती सतत चर्चेत असते. अलीकडेच, अभिनेत्री एका मुलाखतीत बॉलिवूड इंडस्ट्रीबद्दल बोलली आहे. बॉलिवूड हे कोणत्याही मुद्द्यासाठी सोपे लक्ष्य बनले आहे आणि देशातील मीडिया इंडस्ट्रीच्या वाढत्या संख्येने नकारात्मक हेडलाइनमध्येही भर पडली आहे, असे तिचे मत आहे. त्याचवेळी सोनाली सुशांत सिंग राजपूतच्या (Sushant Singh Rajput) मृत्यूबद्दल आणि आर्यन खानच्या (Aryan Khan) ड्रग्ज केसबद्दलही बोलली.
मुलाखतीदरम्यान सोनाली बेंद्रे म्हणाली की, “गेल्या दोन वर्षांपासून चुकीच्या कारणांमुळे इंडस्ट्री चर्चेत आहे, हे पाहून खूप वाईट वाटते.” सोनाली म्हणाली, “माझ्या प्रोफेशनबद्दल नकारात्मक बातम्या ऐकणे भयंकर आहे, कारण त्यामुळेच मला नाव आणि प्रसिद्धी मिळाली आहे. यानेच मला घडवले आणि म्हणूनच या व्यवसायात काम करणाऱ्या लोकांबद्दल माझ्या मनात खूप आदर आहे. मी माझे कुटुंब इथे बनवले आहे.” (sonali bendre said its horrible to read negative news about bollywood)
ती पुढे म्हणाले, “फिल्म इंडस्ट्रीला कोणत्याही मुद्द्यावर टार्गेट करण्यासाठी सोपे आहे. अनेकवेळा अभिनेत्यांवर अज्ञात प्रकरणात गुन्हाही दाखल झाला आहे. गेल्या दोन वर्षांत बॉलिवूड सतत मीडियामध्ये चर्चेत होते. विशेषत: जून २०२० मध्ये सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर. ज्यामुळे इंडस्ट्रीत आउटसाइडर आणि इनसाइडर वादविवाद झाला. तसेच कथित ड्रग्ज प्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने तपास केला.” त्याचवेळी शाहरुख खानचा (Shahrukh Khan) मुलगा आर्यन खान ड्रग्ज प्रकरणामुळे बराच काळ चर्चेत होता. आर्यनला नुकतीच क्लीन चिट देण्यात आली आहे.
सोनाली म्हणाली की, “इंडस्ट्रीभोवती नकारात्मक बातम्या आता वाढल्या आहेत. कारण अगोदर चार मीडिया आउटलेट होती, जी आता ४००० झाली आहेत. अनेकवेळा तुम्ही ऐकले असेल की, अंडरवर्ल्डचा पैसा इथे गुंतवला आहे किंवा इंडस्ट्री काम करणारे लोक दारूच्या नशेत वावरतात. चित्रपटसृष्टीतील चांगल्या गोष्टी क्वचितच समोर येतात असे मला वाटते.”