Sunday, November 24, 2024
Home बॉलीवूड बच्चन कुटुंबाकडून मिळाले होते ‘डॅनी’ नाव, ‘या’ कारणामुळे नाकारली होती ‘शोले’ चित्रपटातील ‘गब्बर सिंग’ची ऑफर

बच्चन कुटुंबाकडून मिळाले होते ‘डॅनी’ नाव, ‘या’ कारणामुळे नाकारली होती ‘शोले’ चित्रपटातील ‘गब्बर सिंग’ची ऑफर

‘खलनायक’… हे नाव ऐकताच आपल्या डोळ्यासमोर उभे राहतात ‘अमरिश पुरी’पासून ते ‘रंजीत’पर्यंतचे दिग्गज कलाकार. या खलनायकांनी आपल्या दमदार भूमिकेने चाहत्यांच्या मनात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली होती. या खलनायकांमधील एक म्हणजेच ‘डॅनी डॅन्झोपा’. डॅनी आजही आपल्या चाहत्यांच्या मनावर छाप सोडत आहेत. नुकतेच ते अभिनेत्री कंगना रणौतच्या ‘मणिकर्णिका’ चित्रपटात दिसले होते. आज (२५ फेब्रुवारी) डॅनी आपला ७३ वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यांच्या या जन्मदिनी त्यांच्या कारकीर्दीतील खास गोष्टींवर टाकलेली एक नजर…

बच्चन कुटुंबाने दिले ‘डॅनी’ नाव
डॅनी डॅन्झोपा बॉलिवूडच्या दमदार खलनायकांमध्ये गणले जातात. असे असले तरीही, त्यांनी केवळ खलनायक म्हणूनच नाही, तर अनेक भूमिका साकारल्या आहेत. त्यांचा जन्म २५ फेब्रुवारी, १९४८ रोजी गंगटोक येथे झाला होता. डॅनी यांचे खरे नाव ‘शेरिंग फिंटसो डॅन्झोपा’ असे आहे. त्यांचे नाव इतके कठीण असल्यामुळे ते उच्चारताना समस्या येत होती. त्यामुळे जया बच्चन यांनी त्यांना ‘डॅनी’ हे नाव दिले. लहानपणी डॅनी यांना सैन्यात भरती व्हायचे होते. परंतु त्यांच्या आईने याबाबतीत त्यांना नकार दिला होता. यानंतर त्यांनी चित्रपटसृष्टीच्या दिशेने पाऊल टाकले.

नाकारली होती ‘गब्बर सिंग’ची भूमिका
भारतीय चित्रपटसृष्टीत जबरदस्त हिट ठरलेला आणि मैलाचा दगड समजल्या जाणाऱ्या ‘शोले’ चित्रपटात गब्बर सिंग यांच्या भूमिकेसाठी डॅनी यांना ऑफर दिली होती. परंतु ते अफगाणिस्तान येथे फिरोज खान यांच्या ‘धर्मात्मा’ चित्रपटाची शूटिंग करत असल्यामुळे त्यांनी ही ऑफर नाकारली होती. त्यांनी नकार दिल्यानंतर ही भूमिका अमजद खान यांना मिळाली होती. या भूमिकेने अमजद खान यांना खूप प्रसिद्धी मिळवून दिली होती. आजही चाहते तितक्याच आवडीने हा चित्रपट पाहतात.

डॅनी हे आपल्या नियमांचे कडेकोटपणे पालन करतात. त्यांच्या जवळची माणसं सांगतात की, ते आजही पहाटे ५ वाजता उठून व्यायाम करतात.

डॅनी यांची लव्ह स्टोरी
बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध अभिनेत्री परवीन बाबी आणि डॅनी यांच्या लव्हस्टोरीची आजही आठवण काढली जाते. परवीन आणि डॅनी एकमेकांवर जीवापाड प्रेम करायचे. इतकेच नव्हे, तर ते दोघेही लिव्ह इनमध्ये राहायचे. डॅनी यांनी फिल्मफेअरला दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले होते की, “परवीन बाबी आणि त्यांचं नातं ३-४ वर्षे राहिले होते. आम्ही दोघांनीही एकसोबत खूप चांगला वेळ घालवला. आम्ही नेहमी मित्र म्हणून राहिलो. त्यानंतर आम्ही एकमेकांना डेट करू लागलो होतो.”

त्यांनी आणखी एका मुलाखतीत म्हटले होते की, ते एकदा डिनर करत होते, तेव्हा पहिल्यांदा त्या टेबलवर त्यांना जाणवले की, परवीन बाबी माझी आहे. त्या घटनेची आठवण काढत डॅनी म्हणतात, “आम्ही तेव्हा डिनर करत होतो. टेबलावर चांदीच्या कामाचे काही तुकडे पडले होते. मी ते हटवण्यासाठी फुंक मारली. त्यावेळी परवीन खूप घाबरली होती. त्यावेळी महेश भट्ट यांनी सांगितले की, परवीन आजारी असते. चिडचिडी झाली आहे.”

ज्यावेळी परवीन बाबीचे निधन झाले, तेव्हा डॅनीही अंत्यसंस्कारामध्ये सामील झाले होते.

डॅनी यांनी जवळपास १९० चित्रपटांमध्ये काम केले आहे. डॅनी यांच्या प्रसिद्ध चित्रपटांमध्ये ‘अग्निपथ’, ‘हम’, ‘सनम बेवफा’, ‘खुदा गवाह’, ‘घातक’, ‘बेबी’ यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे. बॉलिवूडमध्ये खलनायक म्हणून ओळख निर्माण करणारे डॅनी यांनी सन १९९० मध्ये गवासोबत लग्न केले होते. याव्यतिरिक्त डॅनी यांना त्यांच्या शानदार अभिनयासाठी पद्मश्री पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-भाऊ सोपं नाही ‘पंकज त्रिपाठी’ होणं, कधीकाळी स्टूडियोतून धक्के मारून हाकललं होतं.! वाचा कलावंताची संघर्षगाथा

-चिरलेल्या गळ्यासह रक्ताच्या थारोळ्यात आढळला होता ‘या’ अभिनेत्रीचा मृतदेह; अमिताभ यांच्यासोबतच्या भुमिका विशेष गाजल्या

-तुफान स्टारडम पाहिलेल्या ‘या’ पाच सेलीब्रेटींना आयुष्याच्या शेवटी केवळ पैसे नसल्याने गमवावा लागला जीव

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा