मित्रांनो, तुम्ही एखाद्या सेलिब्रेटीचे चाहते असाल, तर तुम्हाला आयुष्यात एकदातरी त्याला भेटण्याची इच्छा असतेच. त्यातही काही सेलिब्रेटी तर क्रशही असतात. त्यांच्या वक्तिमत्त्वाने तुम्ही भारावून गेलेले असता… कधीकधी ते तुमचे सपनों का राजकुमार, खयालों की राणी वैगरे पण असतात. पण तुम्हाला माहितीये का काही असेही बॉलिवूड स्टार आहेत, ज्यांनी खरंच आपल्या फॅनशी लग्न केलंय. नसेल माहिती तरी आम्ही आहोत ना सांगायला. तर आपल्या व्हिडिओचा विषय हाच आहे. आपण आज त्या ५ सेलिब्रेटींबद्दल जाणून घेऊ ज्यांनी आपल्या फॅनशी लग्न केले…
तर या यादीतील आपली पहिली जोडी आहे दिलीप कुमार आणि सायरा बानू. आपल्या काळातील सुपरस्टार असणाऱ्या दिलीप कुमार यांना लाखो चाहते होते. त्यांचे काम पाहून एक लहान मुलगीही त्यांची मोठी फॅन झाली होती. तिच्यासाठी ते सपनों का राजकुमार होते. पण प्रत्येकवेळी स्वप्न खरी होतातच असं नाही, ना. मात्र त्या मुलीचे स्वप्न पुर्ण झाले. ती मुलगी म्हणजे सायरा बानू. १९६६ साली या दोघांनी लग्न केले. लग्नावेळी दिलीप कुमार ४४ वर्षांचे होते, तर सायरा बानू २२ वर्षांच्या होत्या. अनेकांना वाटले होते की, वयाच्या अंतरामुळे त्यांचे नाते खूप काळ टिकणार नाही. पण तसं झालं नाही, त्यांनी आपले नाते यशस्वीपणे निभावले.
मुमताज आणि मयुर माधवानी यांचाही या यादीत समावेश होतो. मुमताज या त्यांच्या सौंदर्या आणि अभिनयामुळे त्यांच्या काळातील मोठ्या स्टार होत्या. त्यामुळे अनेक चाहत्यांसाठी त्या क्रश होत्या. पण त्यांनी लग्न केले ते बिझनेसमन मयुर मधवानीबरोबर. मयुर त्यांचे मोठे फॅन होते. विशेष म्हणजे मुमताज यांना कर्करोग झाल्यानंतरही त्यांनी त्यांची साथ सोडली नाही. मुमताज यांच्या कर्करोगाच्या लढाईत मयुर त्यांच्याबरोबर खंबीरपणे उभे राहिले.
आपल्या अफालातून डान्स आणि अभिनयाने वाहवा मिळवणाऱ्या जितेंद्र यांनीही आपली फॅन असलेल्या शोभा यांच्याशी लग्न केले. शोभा या ब्रिटीश एयरवेजमध्ये एयर हॉस्टेस होते. त्या जितेंद्र यांच्याही मोठ्या फॅन होत्या. जेव्हा ते दोघे भेटले, तेव्हा ते एकमेकांच्या प्रेमात पडले आणि ते या प्रेमाला लग्नमंडपापर्यंत नेण्यातही यशस्वी ठरले. त्यांनी १९७४ मध्ये त्यांनी लग्न केले. त्यांना एकता कपूर आणि तुषार कपूर ही दोन मुले झाली. हे दोघेही बॉलिवूडमध्ये सक्रिय आहेत.
केवळ २० व्या शतकातच सेलिब्रिटींनी आपल्या फॅनशी लग्न केले असं नाही बरं. तर २१ व्या शतकातही अशा जोड्या पाहायला मिळाल्या. इशा देवोल आणि भरत तख्तानी यांचीही जोडी अशीच. शाळेत असताना भरतला इशा आवडायची. पण पुढे ती अभिनय क्षेत्रात गेल्याने त्याने त्यांच्या लग्नाच्या सर्व आशा जवळपास सोडल्या होत्या. पण म्हणतात ना अगर किसी चीज को दिल से चाहो, तो सारी कायनात उसे तुम से मिलाने में लग जाती है, तसंच भरतचंही झालं. भरत आणि इशा यांनी २०१२ साली लग्न केले.
बॉलिवूडमध्ये अनेक चढ-उतार पाहिलेला अभिनेता म्हणजे विविक ओबेरॉय. एकेकाळी त्याच्या आणि ऐश्वर्या रायच्या अफेअरबद्दलही बऱ्याच चर्चा झाल्या होत्या. पण, नंतर विवेकने कर्नाटकच्या मंत्र्याची मुलगी असलेल्या प्रियंका अल्वाबरोबर २०१० मध्ये लग्न केले. विशेष म्हणजे विवेक आणि प्रियंका यांचे अरेंज मॅरेज झाले. पण प्रियंकाने हे स्पष्ट केले होते की ती विवेकची फॅन होती.
इथे पाहा व्हिडिओ: या सेलिब्रेटींनी चक्क फॅनशी केलंय लग्न | Bollywood Celebrities Who Married Their Fans










