Thursday, December 26, 2024
[aioseo_breadcrumbs]

मराठी चित्रपटातील हॉट किसिंग सीन, जे पाहून तुम्हीही व्हाल दंग

हिंदी, साऊथ इंडस्ट्रीत बोल्ड सीन, किसिंग सीन नेहमीच पाहातो. हे पाहाताना आता प्रेक्षकांना आता काही नवलही वाटत नाही. हळूहळू हा ट्रेंट आता मराठी सिनेसृष्टीतही दिसू लागलाय… मागील काही वर्षांत काही अभिनेत्री – अभिनेत्यांनी मराठी चित्रपटांमध्येही बोल्ड सीन दिल्याचे तुम्हीही पाहिले असेलच. काही चित्रपटांत तर किसिंग सीनही दिसले. पण हे सीन प्रेक्षकांना वल्गर वाटणार नाहीत, याची काळजी घेतलेलीही अनेकदा दिसून आले, असे असले तरी बदलत्या ट्रेंडला स्विकारत प्रवाहाबरोबर पुढे जाणे महत्त्वाचे ठरते. त्याचप्रमाणे मराठी चित्रपटांमध्ये किसिंग सीन शूट करण्यात आले. तर मंडळी आपण आज या व्हिडिओतही मराठी चित्रपटामधील लक्षवेधी ठरलेल्या बोल्ड किसिंग सीनबद्दल जरा जाणून घेऊयात.

जोगवा हा चित्रपट खूप जास्त गाजला. राष्ट्रीय पुरस्कारही या चित्रपटाने जिंकत सर्वांची वाहवा मिळवली होती. या चित्रपटातील मुक्ता बर्वे आणि उपेंद्र लिमये यांनी साकारलेल्या जोगता आणि जोगतीन या भूमिकांचेही खूप कौतुक झाले. या चित्रपटाची जेवढी चर्चा झाली, तेवढीच चर्चा त्यांनी दिलेल्या किसिंग सीनचीही झाली. त्यांच्यातील रोमँटिक सीननेही सर्वांच्या भुवया उचावल्या होत्या. पण असे असले तरी कथेला अनुसरून हे बोल्ड सीन असल्याने त्यावर फार टीका झाली नाही. तसेच या चित्रपटापासून पुढे अनेक मराठी चित्रपटामध्ये बोल्ड सीन बऱ्यापैकी दिसायला लागले.

स्वप्निल जोशी, प्रार्थना बेहरे आणि सोनाली कुलकर्णी यांची प्रमुख भूमिका असलेला चित्रपट म्हणजे मितवा. प्रेमाबद्दल सांगणाऱ्या या चित्रपटाचे अनेकांकडून कौतुक झाले. त्यातही स्वप्नील आणि सोनाली यांच्या केमिस्ट्रीने सर्वांची मनं जिंकली, याबरोबरच त्यांनी दिलेला लाँग किसिंग सीनही चर्चेचा विषय ठरला होता.

या यादीत रियल लाईफ कपलच्या दोन जोड्याही आहेत बरं. पहिली म्हणजे प्रिया बापट आणि उमेश कामत आणि दुसरी जोडी म्हणजे उर्मिला कानिटकर-कोठारे आणि आदिनाथ कोठारे. प्रिया आणि उमेश ही जोडी चांगलीच हिट आहे. त्यांचे गोड फोटो आणि व्हिडिओही चाहत्यांना पाहायला आवडत असतात. पण याच रिअल लाईफ जोडीने सिनेमातही किसिंग सीन केलाय. त्यांनी समीर विद्धांस यांनी दिग्दर्शीत केलेल्या टाईम प्लीज या चित्रपटात किसींग सीन शूट केला होता. तर या यादीतील दुसरी रिअल लाईफ जोडी उर्मिला आणि आदिनाथ यांनी दुभंग या चित्रपटात किसिंग सीन दिलेला. विशेष म्हणजे हा चित्रपट महेश कोठारे यांनी दिग्दर्शित केला होता. या चित्रपटात उर्मिला आणि आदीनाथ यांच्यात अनेक रोमँटिक सीननेही चाहत्यांची मनं जिंकली होती.

पुणे५२ हा नात्यांमधील गुंतागुंत दाखवणारा चित्रपट असून या चित्रपटात गिरिश कुलकर्णी आणि सई ताम्हणकर यांच्यात रोमँटिक सीनही शुट झाले होते. त्यांनी या चित्रपटात दिलेल्या लिप-लॉक आणि लाँग किसिंग सीनने सर्वांना चकीत केले होते.

याशिवाय शॉर्टकट: दिसतो पण नसतो या चित्रपटात संस्कृती बालगुडे आणि वैभव तत्ववादी यांनीही लिपलॉक सीन दिला होता. नेहमीच सोज्वळ आणि साध्या भूमिकेत दिसणारी संस्कृती या चित्रपटात हॉट लूकमध्ये दिसली होती. त्यामुळे सर्वांच्याच भुवया ताणल्या गेल्या होत्या.

इथे पाहा व्हिडिओ: मराठी सिनेमातील लक्षवेधी ठरलेले किसिंग सीन | Kissing scenes | Marathi Movie

हे देखील वाचा