Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

ओटीटीवर पहिल्यांदाच पदार्पण करणाऱ्या बोमन ईरानी यांच्यासाठी मुलीने केली भावुक पोस्ट

भारतीय सिनेमामध्ये अशी अनेक कुटुंबं आहेत, की ज्यांच्यात दिग्गज अभिनेता-अभिनेत्रींचा समावेश आहे. याच साखळीत अजून एक कुटुंब समोर आले आहे. फादर्स डे जवळ आला असताना एका मुलीने आपल्या वडिलांबाबात खूपच हृदयस्पर्शी गोष्ट बोलून दाखवली आहे. तिचे वडिल पहिल्यांदाच ओटिटीवर भूमिका करणार आहेत, आणि ती स्वतःसुद्धा त्यांच्यासह स्क्रीन शेअर करणार आहे.

नव्वदच्या दशकातील अभिनेता दीपक तिजोरीची (Deepak Tijori) मुलगी समारा तिजोरी (Samara Tijori), हिची आगामी वेब सीरीज ‘मासूम’चा ट्रेलर रिलीझ झाले आहे. यापूर्वी समाराने अभिषेक बच्चनसोबत (Abhishek Bachchan) ‘बॉब बिस्वास’मध्ये काम केले होते. आता ती बॉलिवुडचे प्रख्यात अभिनेते बोमन ईरानी (Boman Irani) यांच्यासह Disney+Hotstarची सीरिज ‘मासूम’ मध्ये दिसणार आहे.

या वेब सीरिजचा ट्रेलर सस्पेंसने भरलेला आहे. यात एका कुटुंबाची कथा आहे. यातून समोर येते, की एक वाईट भूतकाळ कशा पद्धतीने एका चिमुकल्याचे आयुष्य आणि विचारांना पूर्णत: कलाटणी देतो. मंजिरी फडणीसने (Manjiri Fadnnis) बोमन ईरानी यांच्यासह भूमिका साकारली आहे. तिने वडिल आणि मुलीच्या अनमोल नात्याबाबत स्वदेशी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘कू’वर लिहिले आहे, “ऑनस्क्रीन डैड, के साथ काम करने से बेहतर और क्या हो सकता है
#HotstarSpecials #Masoom । 17 जून से सभी एपिसोड्स स्ट्रीम हो रहे हैं सिर्फ #disneyplushotstar पर.”

यावर क्लिक करून पाहा ती पोस्ट

हॉटस्टारची खास निर्मिती असलेल्या ‘मासूम’चे दिग्दर्शन मिहिर देसाईने केले आहे. हा प्रयोग म्हणजे गुरमीत सिंगने शोरनरच्या भूमिकेत गाजवलेली अवॉर्ड विनिंग आयरिश सीरीज ‘ब्लड’ चे भारतीय वर्जन आहे. एका व्यक्तीने आपले कुटुंब गमावल्यावर त्याच्या वाट्याला येणारी फसवणूक आणि बदललेले कौटुंबिक संबंध यांच्या कथेवर यातून प्रकाश टाकलेला आहे. हा शो ‘ड्रीमर्स ऍन्ड डूअर्स’ कंपनीच्या बॅनरअंतर्गत बनलेला आहे. हा रिलायन्स एंटरटेनमेंटचा एक भाग असून प्रीमियम कंटेंट स्टूडियो आहे. या सीरिजमध्ये फेमस आनंद भास्कर कलेक्टिवचा एक सोलफुल साउंडट्रॅकही घेतला गेला आहे.

‘मासूम’मध्ये बोमन ईरानी यांच्यासह समारा तिजोरी आणि उपासना सिंग, मंजिरी फडणीस, सारिका सिंग, वीर राजवंत सिंग, मनुर्षी चड्ढा असे अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसतील. ही सीरिज १७ जून २०२२ रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म Disney+Hotstar वर प्रसारित होईल.

हे देखील वाचा