सध्या छोट्या पडद्यावरील ‘सुंदरा मनामध्ये भरली’ मालिका प्रचंड गाजताना दिसत आहे. या मालिकेला घराघरातून प्रेक्षकांचा जोरदार भरभरुन प्रतिसाद मिळत असून मालिकेची कथा आणि कलाकारांच्या अभिनयाचे प्रेक्षक चांगलेच कौतुक करत आहेत. यामध्ये सर्वात जास्त लतिकाच्या भूमिकेतील अक्षया नाईकने (Akshaya naik) प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे. मात्र नुकतीच या मालिकेच्या सेटवर अक्षयाला दुखापत झाल्याची माहिती तिने आपल्या आपल्या चाहत्यांना दिली आहे. सध्या तिची ही पोस्ट चांगलीच व्हायरल होत असून त्यावर चाहत्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत.
कलर्स वाहिनीवरील सुंदरा मनामध्ये भरली मालिकेतील लतिका म्हणजेच अक्षया नाईक सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. आपल्या दमदार अभिनयाने आणि आव्हानात्मक भूमिकेने तिने प्रेक्षकांचे चांगलेच लक्ष वेधले आहे. लतिकाच्या या दमदार भूमिकेचे प्रेक्षक नेहमीच जोरदार कौतुक करताना दिसत आहेत. मात्र नुकतीच लतिकाच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली असून मालिकेच्या सेटवर अक्षयाला दुखापत झाली आहे. काही दिवसांपासून ती तशीच काम करत होती मात्र आता तिचे दुखणे चांगलेच वाढले आहे, ज्यामुळे तिला व्हीलचेअरचा वापर करावा लागत आहे. याबद्दलची माहिती स्वतः अभिनेत्री अक्षया नाईकने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन दिली आहे.
आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरुन अक्षयाने ही पोस्ट केली आहे ज्यामध्ये तिने “The show must go on” असं आपण सगळेच बोलतो, पण जीवापेक्षा मोठं दुसरं काही नाही. कलर्स मराठीचे मी आभार मानते की त्यांनी माझ्या प्रक्रूतिनुसार कथेत काही बदल करून मला आरामासाठी वेळ दिला. Ligament Tear असल्यामुळे सध्या आराम हाच उपाय आहे, बाकी डॉक्टर सांगतिलच. तुम्ही सुंदरा बघत रहा,” असे आवाहन चाहत्यांना केले आहे. सध्या तिची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा