Thursday, August 7, 2025
Home बॉलीवूड Viral Video: दिलीप कुमार यांच्या आठवणीने भावूक झाल्या सायरा बानू, पुरस्कार स्विकारताना स्टेजवरच कोसळले रडू

Viral Video: दिलीप कुमार यांच्या आठवणीने भावूक झाल्या सायरा बानू, पुरस्कार स्विकारताना स्टेजवरच कोसळले रडू

दिलीप कुमार (Dilip Kumar) हे हिंदी चित्रपट जगतातील एक प्रतिभावान अभिनेते म्हणून लोकप्रिय होते. आपल्या दमदार अभिनयाने त्यांनी सिने जगतात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली होती. जुलै २०२१ मध्ये त्यांचे निधन झाले. नुकताच दिलीप कुमार यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी त्यांच्या पत्नी सायरा बानू खूपच भावूक झालेल्या पाहायला मिळाल्या. सध्या त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. 

‘भारतरत्न डॉ. आंबेडकर पुरस्कार’ स्वीकारण्यासाठी अभिनेत्री सायरा बानू जेव्हा गेल्या तेव्हा त्या त्यांचे दिवंगत पती दिलीप कुमार यांच्या आठवणीत खूपच भावूक झाल्या होत्या. मंगळवारी सायरा बानो दिलीप कुमार यांना दिलेला पुरस्कार घेण्यासाठी एका कार्यक्रमात पोहोचल्या होत्या पुरस्कार स्वीकारताना त्यांनी रडत रडत  ‘तोअजूनही इथेच आहे असे म्हणता त्यांनी आपल्या अश्रुंना वाट मोकळी करुन दिली होती. या कार्यक्रमात  त्यांनी दिलीप कुमार यांना कोहिनूर होते असे म्हणत त्यांच्या कार्याचा गौरव केला त्याचबरोबर त्यांनी दिलीप कुमार यांना  भारतरत्न पुरस्कार देण्याचीही मागणी केली.

सायरा बानोंचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये सायरा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यासोबत फोटो काढताना दिसत आहेत. यावेळी त्या दिवंगत पती, केंद्रीय मंत्र्यासह, पोस्टरच्या मागे आहेत का येतील असाच अंदाज घेऊन फोटो काढताना दिसत आहेत. यानंतर रामदास आठवले दिलीप कुमार यांच्याबद्दल बोलताच सायरा रडल्या. यावेळी त्यांनी यामुळेच मला कार्यक्रमांना हजेरी लावू वाटत नाही कारण मी खूपच भावूक होते असेही म्हणाल्या. सध्या त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा