बॉलिवूडमधील भाईजान सलमान खान याची दोस्ती आणि रागामुळे तो चाहत्यांमध्ये नेहमीच चर्चेचा विषय असतो. जर सलमान खान एखाद्यावर खुश झाला तर तो त्याच्यासाठी काहीही करण्यासाठी तयार असतो. परंतु जर तो कोणावर नाराज असेल तरी तो ती गोष्ट अगदी खुल्या मनाने समोरच्या व्यक्तीला सांगत असतो. सलमान खानच्या या रागाचा शिकार बॉलिवूडमधील पॉवर हाऊस अस संबोधलं जाणाऱ्या रणवीर सिंग हा झाला होता.
खरंतर ही गोष्ट तेव्हाची आहे जेव्हा सलमान खान आणि अनुष्का शर्मा यांचा सुलतान हा चित्रपट रिलीज झाला होता. त्यावेळी रणवीर सिंग हा चित्रपट पॅरिसमधील एका थेटरमध्ये बघायला गेला होता, तेव्हा चित्रपटातील एका गाण्यावर रणवीरने स्क्रीनच्या समोर जाऊन डान्स केला होता. पण जेव्हा सुलतान या चित्रपटाच्या एका इव्हेंटमध्ये सलमान खानला जेव्हा रणवीरच्या याच डान्सबद्दल विचारण्यात आले. तेव्हा तो रणवीर सिंगवर खूप नाराज असल्याचे दिसून आला.
सलमान खानने आपला राग मीडियासमोर व्यक्त करताना असे सांगितले की,” मला रणवीरला जिवानिशी मारून टाकावं असं वाटतं होतं.” एवढंच नाही तर त्याने रणवीरच्या डोक्यावर चेअर फेकण्याबद्दल देखील वक्तव्य केलं होतं.
यानंतर सलमान खान असे म्हणाला की, ‘सगळे प्रेक्षक चित्रपट बघत होते आणि हा मध्ये डान्स करून त्यांना डिस्टर्ब करत होता.’ त्याच्या या व्यक्तव्यानंतर त्याच्या शेजारी बसलेली अनुष्का शर्मा जरा घाबरली, परंतु सलमानने पुन्हा स्माईल देऊन वातावरण हलके फुलके केले.
रणवीर सिंग हा सलमान खानचा आवडता अभिनेता आहे. परंतु जेव्हा प्रश्न त्याच्या चित्रपटाचा आला तेव्हा मात्र सलमानला खूप राग आला. सलमान आणि रणवीरच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, सलमान सध्या त्याच्या ‘राधे’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे, तर रणवीर देखील ’83’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.