Monday, August 11, 2025
Home वेबसिरीज ‘मी निर्मात्यांशी खुप भांडले पण..’ पहिल्या किसिंग सीनबद्दल अभिनेत्रीने केला धक्कादायक खुलासा

‘मी निर्मात्यांशी खुप भांडले पण..’ पहिल्या किसिंग सीनबद्दल अभिनेत्रीने केला धक्कादायक खुलासा

आमना शरीफ (Aamna sharif ) ही अभिनय जगतातील एक अष्टपैलू कलाकार म्हणून सर्वत्र परिचित आहे. छोट्या पडद्यावरील मालिका, चित्रपट आणि आता ओटीटी प्लॅटफॉर्म असा यशस्वी प्रवास तिने पूर्ण केला आहे. प्रत्येक मंचावर आपल्या अभिनयाने आणि घायाळ करणाऱ्या सौंदर्याने तिने सर्वांनाच दखल घ्यायला भाग पाडले आहे. नुकतीच आमनाची पहिली वेबसिरीज ‘आधा इश्क’ नुकतीच वूटवर प्रदर्शित झाली आहे. या सिरीजमधील तिच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे. या सिरीजमधील किसिंग सीनबद्दल आमनाने नुकताच एक धक्कादायक खुलासा केला आहे. काय आहे हे प्रकरण चला जाणून घेऊ. 

अभिनेत्री आमना शरीफ एक प्रतिभावान अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. आमनाची वेब सिरीज ‘आधा इश्क’ काही आठवड्यांपूर्वी वूट प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाली असून तिच्या कामाचे खूप कौतुक होत आहे. आमनाने यात रोमाची भूमिका केली होती. अलिकडेच तिने वेब सीरिजमधील आपल्या पहिल्या किसिंग सीनबद्दल सांगितले आहे. एका मुलाखतीत बोलताना आमनाने याबद्दलचे खुलासे केले आहेत.  या मुलाखतीत जेव्हा आमनाला विचारले गेले की “ती ओटीटीवरील स्क्रिप्टबद्दल खुश आहे का कारण तिथे खूप बोल्ड कंटेंट आहे,” तेव्हा तिने उत्तर दिले की “स्क्रिप्टच्या मागणीनुसार मी पहिल्यांदाच ऑनस्क्रीन किस केले.  कोणत्याही बाजूने जबरदस्ती केल्यासारखे वाटले नाही. हा सीन काढला तर योग्य वाटणार नाही कारण ही एक उत्कट प्रेमकथा आहे.”

आमना पुढे म्हणाली की “ती या सर्व गोष्टींबद्दल खूप उत्सुक आहे आणि तिला हे सर्व ओटीटीवर चालते म्हणून अजिबात करायचे नाही. आमना शरीफ पुढे म्हणाली की, तिने तिच्या दिग्दर्शक आणि निर्मात्यांशी अनेकदा किसिंग सीनबद्दल बोलली, त्याची गरज का आहे, यावरून त्यांच्यात बरीच चर्चा झाली. आमनाही गंभीर वादात सापडली, पण त्या लोकांनी तिला हे का आवश्यक आहे हे समजावून सांगितले आणि तिलाही या सीनचे महत्त्व समजले. तेव्हाच तो हो म्हणाली,” आमनाच्या म्हणण्यानुसार, ती पडद्यावर जे काही करत आहे, तिला समजावून सांगणे तिच्यासाठी महत्वाचे आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हे देखील वाचा