नेटकऱ्यांमध्ये नेहमीच स्टार किड्स बद्दल अनेक बातम्या नेहमीच येत असतात. सामान्यांना कलाकार आणि त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता असते. त्यात अनेकांच्या स्टार किड्सवर चर्चा रंगताना दिसत असतात. जर मोठ्या, प्रसिद्ध आणि आवडत्या कलाकारांचे मुलं असतील तर मग विचारायलाच नको. कधी कधी तर कलाकारांपेक्षा जास्त स्टार किड्सला इंटरनेटवर सर्च केले जाते. आजच्या काळात विराट अनुष्का यांच्या मुलीपासून, करीनाच्या दोन्ही मुलांपर्यंत अनेक किड्स लक्ष आकर्षित करतात. मात्र यांमध्ये एक स्टार कीड अशी सुद्धा आहे, जिच्या नावात बॉलीवूडमधले सर्वात मोठे आडनाव लावले जाते. ही स्टार कीड आहे आराध्या बच्चन.
आराध्या नेहमीच मीडिया, फोटोग्राफर्स, सामान्य जनतेचा आकर्षणाचा बिंदू ठरली आहे. मिस वर्ल्ड असलेल्या ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चनची मुलगी महानायकांची नातं एवढी ओळख आराध्यासाठी भरपूर आहे. ते म्हणतात ना ‘बस्स नाम ही काफी हैं’ हे आराध्याला तंतोतंत लागू पडते. आराध्याचे अनेक व्हिडिओ फोटो नेहमी व्हायरल होत असतात, आणि या सर्वाना फॅन्सकडून भरपूर प्रेम देखील मिळते.
सध्या आराध्याचा असच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. एका लग्नात आराध्या तिच्या आई, बाबांसोबत ‘देसी गर्ल’ गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. अर्ध्याच डान्स पाहून अभिषेक ऐश्वर्यासह तिथे उपस्थित सर्वच जोरात टाळ्या वाजवत आराध्याला चियर करत आहे.
ऐश्वर्या नुकतीच अभिषेक, आराध्यासोबत तिच्या बहिणीच्या श्लोका शेट्टीच्या लग्नासाठी बंगलोरला पोहचली होती. या लग्न सोहळ्याआधी झालेल्या संगीत कार्यक्रमाच्या वेळी डान्स फ्लोरवर आराध्याने तिच्या वडिलांच्या गाण्यावर जबरदस्त डान्स केला. यावेळी ऐश्वर्या आराध्याचा डान्स पाहून इतकी खुश झाली की, लगेच तिला आनंदाने मिठी मारली. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
या कार्यक्रमात ऐश्वर्याने सिल्वर रंगाचा लेहेंगा घातला होता तर अभिषेकने सुद्धा सिल्वर रंगाचा कुर्ता पायजमा घातला आणि आराध्याने लाल रंगाचा घागरा घातला होता. महत्वाचे म्हणजे लग्नात या तिघांनीही कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करत मास्क देखील घातले आहे.