दमदार डान्स आणि कॉमेडीसाठी ओळखला जाणारा गोविंदा (Govinda) नव्वदच्या दशकातील एक अतिशय यशस्वी अभिनेता आहे. त्या काळात त्याने एकापेक्षा एक सरस चित्रपट दिले अहेय. त्यानंतर त्याला ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ची ऑफर मिळाली, ज्यामध्ये त्याला बॉलिवूडचे शेहांशः अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्यासोबत काम करायचे होते.
अमिताभ बच्चन हे हिंदी चित्रपटसृष्टीतील एक असे कलाकार आहेत, जे चित्रपटाच्या सेटवर नेहमी वेळेवर पोहोचतात. जेव्हा गोविंदाला हे समजले, तेव्हा तो खूप घाबरला. कारण त्यावेळी त्याच्याकडे चित्रपटांची लाईन असायची, त्यामुळे चित्रपटाच्या सेटवर तो उशिरा पोहोचत असे. (amitabh gave this advice to govinda who came late)
या संपूर्ण प्रकरणाबद्दल गोविंदाने एका मुलाखतीत सांगितले होते की, लोक त्याला घाबरवू लागले की अमिताभ बच्चन सेटवर नेहमी वेळेवर येतात. त्यानंतर त्याने लोकांना सांगितले की, त्याच्याकडे अनेक चित्रपट असल्यामुळे तो वेळेवर येऊ शकत नाही. गोविंदा अनेक चित्रपटांचे शूटींग करत असे, त्यामुळे त्याने या प्रकरणी थेट अमिताभ बच्चन यांच्याशी चर्चा केली. बिग बींनाही गोविंदाचा मुद्दा समजला आणि ते म्हणाले, ‘तू मला फोन करून सांग किती वाजता येणार आहेस. मला काही प्रॉब्लेम नाही.’
अमिताभ यांनी दिलेल्या या सल्ल्याने गोविंदाची या समस्येतून सुटका झाली. यानंतर ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ या चित्रपटाच्या सेटवर येण्यापूर्वी गोविंदा अमिताभ यांना फोन करून सांगत असे आणि अशा प्रकारे त्यांनी चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले. या चित्रपटाबद्दल गोविंदाने असेही सांगितले होते की, त्याने स्क्रिप्ट न वाचताच हा चित्रपट साइन केला होता.
हेही वाचा-
–‘दबंग खान’ सलमानचा भाऊ असूनही सोहेल खानला करावं लागलं होतं पळून जाऊन लग्न? वाचा कारण
–धक्कादायक! प्रसिद्ध अभिनेत्रीच्या केसाला लागली आग अन…, व्हिडिओ झाला व्हायरल