गोपनीयता ही सामान्य माणसांपासून ते मोठमोठ्या व्यक्तीपर्यंत सर्वांसाठीच महत्त्वाची असते. विशेषत: कलाकारांना तर याची खूपच गरज भासते असे म्हणणे वावगे ठरणार नाही. कारण, ग्लॅमरने भरलेल्या आयुष्यामुळे त्यांना अनेकदा समस्यांचा सामना करावा लागतो. त्यांच्याशी संबंधित प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असतात. या उत्सुकतेमुळे कधीकधी कलाकारही संकटात सापडतात. विशेषत: कलाकार नवजात मुलांसाठी ही गोपनीयता महत्त्वाची असते. त्यामुळे ते मुलांना लाईमलाईटपासून दूर ठेवतात. मात्र, पॅपराजी आणि चाहते कलाकारांच्या मुलांचे फोटो काढतात आणि ते शेअर करतात. आता याबाबत नियम कडक करण्यात आलेत.
काही काळापूर्वी भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) यांच्या मुलीबाबत असेच काहीसे झाले होते. विराट आणि अनुष्काने त्यांच्या मुलीचे फोटो काढून शेअर करू नका असे आवाहन केले होते. त्यांचे असे म्हणणे होते की, त्यांना आपली मुलगी या सर्व गोष्टी समजण्याइतपत मोठी होत नाही, तोपर्यंत तिचा चेहरा सोशल मीडियाला दाखवायचा नाही. मात्र, त्यांचे आवाहन फाट्यावर मारत त्यांच्या मुलीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले. कलाकार असो किंवा सामान्य व्यक्ती, लहान मुलांचे फोटो सोशल मीडियावर टाकताना त्यांची सुरक्षा लक्षात घेणे गरजेचे आहे. याबाबत असलेले बाल अधिकार आणि गोपनीयतेचा अधिकार काय सांगतो हे जाणून घेणे गरजेचे आहे.
गोपनीयतेचा अधिकार (Right To Privacy)
प्रत्येक व्यक्तीला गोपनीयतेचा अधिकार देण्यात आला आहे. संविधानात कलम २१मध्ये याबाबत सांगण्यात आले आहे. यानुसार, कोणत्याही व्यक्तीला हे स्वातंत्र्य आहे की, जर एखाद्याची परवानगी असेल, तरच त्याची माहिती इतर व्यक्ती किंवा संस्थेकडे जाऊ शकते, नाहीतर तसे होऊ शकत नाही. त्यासाठी हा कायदा मोडला जाऊ शकत नाही. कोणत्याही व्यक्तीला त्याची माहिती स्वत:पुरती मर्यादित ठेवायची असेल, तर त्याबाबत जाणून घेण्याचा अधिकार इतरांना नाही. जर कुणी असे केले, तर उल्लंघनासाठी व्यक्ती अपील करू शकतो.
मुलांचे कायदेशीर अधिकार
मुलांच्या संरक्षणासाठी कायद्यात अनेक तरतुदी करण्यात आल्या आहेत. ज्या अंतर्गत त्यांची योग्य काळजी आणि संरक्षणाचा अधिकार देखील समाविष्ट आहे. बालहक्कांतर्गत सार्वत्रिक तत्त्व असे आहे की, बालकांच्या सर्वोत्तम हिताला सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे. अशा परिस्थितीत पालकांनी मुलांच्या सुरक्षेबाबत कोणतेही पाऊल उचलले, तर त्यांचे पालन करणे आवश्यक होते.
आई-वडिलांची परवानगी घेणे आवश्यक
अनेकदा जेव्हा मुले आपल्या मित्रांसोबत किंवा पालकांसोबत फिरायला जातात, तेव्हा ते त्यांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करतात. यावेळी कोणत्याही मुलाचे (जो स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकत नाही म्हणजेच लहान) फोटो शेअर करण्यापूर्वी त्याच्या पालकांची परवानगी घेणे आवश्यक आहे. पालकांच्या संमतीशिवाय तुम्ही कोणत्याही मुलाचे चित्र सोशल मीडियावर पोस्ट करू शकत नाही.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
- चटका लावणारी बातमी! प्रसिद्ध अभिनेत्रीची पंख्याला लटकून आत्महत्या, वयाच्या २३व्या वर्षीच सोडले जग
- BIRTH ANNIVERSARY | ‘कूल मॉम’चा ट्रेंड आणणाऱ्या रीमा लागू, जाणून घ्या त्यांच्या झक्कास पात्रांबद्दल
- ‘तरुणांकडून काय प्रतिक्रिया अपेक्षित आहेत?’, ‘अग्निवीर’वर भाजप नेत्यांच्या वक्तव्यावर संतापले प्रकाश राज