सध्या अभिनेता रणबीर कपूर त्याच्या आगामी ‘शमशेरा’ या सिनेमामुळे चांगलाच चर्चेत आहे. त्याच्या ‘शमशेरा’ या सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. या ट्रेलरला चाहत्यांनी भरपूर प्रेम दिले. यानंतर आता अभिनेत्याने लगेचच सिनेमाच्या प्रमोशनला सुरुवात केली आहे. सोशल मीडियावरही रणबीरच्या सिनेमाचे जोरदार प्रमोशन होत आहे. मात्र, रणबीरला स्वत:ला सोशल मीडियावर आपल्याच सिनेमाचे प्रमोशन करता येत नाहीये. यामागील कारण म्हणजे, त्याचे कोणतेही अधिकृत सोशल मीडिया अकाऊंट नाहीये. अशातच त्याने इंस्टाग्रामवरील आपल्या अकाऊंटबाबत मोठा खुलासा केला आहे.
रणबीर कपूरचा मोठा खुलासा
अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) याला त्याचे वैयक्तिक आयुष्य खासगी ठेवायला आवडते. त्यामुळेच तो अधिकृतरीत्या सोशल मीडियावर नाहीये. मात्र, नुकतेच रणबीरने असे काही सांगितले आहे, जे जाणून तुम्हीही हैराण व्हाल. रणबीरने एक फोटो शेअरिंग वेबसाईटशी बोलताना खुलासा केला की, त्याचे एक गुपीत इंस्टाग्राम अकाऊंट आहे. त्याने सांगितेल की, या अकाऊंटवर फॉलोवर्स आणि पोस्ट दोन्हीही नाहीत. तो याचा वापर फक्त अपडेट्स घेण्यासाठी करतो. यादरम्यान त्याने असाही खुलासा केला की, येत्या काही काळात तो आपले हे अकाऊंट सार्वजनिक करू शकतो. मात्र, सध्यातरी तो सोशल मीडियापासून दूर आहे.
रणबीर करतोय शमशेराचे जोरदार प्रमोशन
रणबीर कपूर सध्या आपल्या आगामी ‘शमशेरा’ (Shamshera) या सिनेमाला हिट करण्यासाठी जोरदार प्रमोशन करण्यामध्ये व्यस्त आहे. त्यामुळेच तो सतत मुलाखतींचा भाग होताना दिसत आहे. अशाच एका मुलाखतीदरम्यान त्याने आपल्या पहिल्या पगाराबद्दलही खुलासा केला. त्याने सांगितले की, त्याने आपला पहिला पगार आपल्या आईच्या पायांवर ठेवला होता. खरं तर रणबीरने ‘प्रेम ग्रंथ’ सिनेमात सहाय्यक कलाकाराच्या रूपात काम केले होते. त्यासाठी त्याला २५० रुपये मिळाले होते. त्याने खुलासा केला की, त्याची आई त्यावेळी खूपच भावूक झाली होती आणि त्यांच्यासाठी हा फिल्मी क्षण होता.
रणबीरव्यतिरिक्त कोण कोण असणार सिनेमात?
रणबीर कपूर या सिनेमात ‘शमशेरा’ या डाकूच्या भूमिकेत झळकणार आहे. त्याच्याव्यतिरिक्त या सिनेमात अभिनेता संजय दत्तही असणार आहे. तो या सिनेमात ब्रिटीशांसाठी काम करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांच्या रुपात दिसणार आहे. तसेच, अभिनेत्री वाणी कपूर हीदेखील सिनेमात रणबीरसोबत रोमान्स करताना दिसणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-