Saturday, August 2, 2025
Home बॉलीवूड पहिला अन् दुसरा दिवस सोडाच, तिसऱ्या दिवशी ‘जुग जुग जिओ’ने छापलेत ‘एवढे’ कोटी, टाका एक नजर

पहिला अन् दुसरा दिवस सोडाच, तिसऱ्या दिवशी ‘जुग जुग जिओ’ने छापलेत ‘एवढे’ कोटी, टाका एक नजर

बॉलिवूड कलाकार वरुण धवन, कियारा आडवाणी, अनिल कपूर, नीतू कपूर, मनीष पॉल आणि प्राजक्ता कोळी यांसारखी तगडी स्टारकास्ट असलेला ‘जुग जुग जिओ‘ हा सिनेमा शुक्रवारी (दि. २४ जून) प्रदर्शित झाला. पहिल्या दिवशी संमिश्र प्रतिसाद मिळाल्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली. या सिनेमाला चाहत्यांसोबतच समीक्षकांकडूनही शानदार प्रतिसाद मिळत आहे. या सिनेमाने पहिल्या वीकेंडला केलेल्या खास कमाईनंतर असे दिसते की, येत्या काही दिवसांमध्येही सिनेमा बक्कळ कमाई करणार आहे.

वीकेंडच्या दिवशी किती केली कमाई?
जुग जुग जिओ‘ (Jug Jugg Jeeyo) या सिनेमाने पहिल्याच दिवशी ९.२८ कोटी रुपयांची कमाई केली होतदी. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सिनेमाच्या कमाईत चांगलीच वाढ झाली. शनिवारी (दि. २५ जून) सिनेमाने १२.५५ कोटी रुपयांची कमाई केली होती. दुसरीकडे, वीकेंडच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच रविवारी सिनेमाने १५.१० कोटी रुपयांचा गल्ला जमवला. अशाप्रकारे सिनेमाने पहिल्या ३ दिवसात ३६.९३ कोटी रुपयांची कमाई केली आहे.

ट्रेड ऍनालिस्ट तरण आदर्श (Taran Adarsh) यांनी विश्वास व्यक्त केला आहे की, सिनेमाला या शर्यतीत कायम राहण्यासाठी चौथ्या दिवशीही म्हणजेच सोमवारीही चांगली कमाई करण्याची गरज आहे. त्यांनी असेही सांगितले की, पहिल्या वीकेंडला जास्त कमाई (Jug Jugg Jeeyo First Weekend Box Office Collection) करणाऱ्या सिनेमांमध्ये ‘जुग जुग जिओ’ हा चौथा सिनेमा बनला आहे. यामध्ये पहिल्या क्रमांकावर ‘भूल भुलैय्या २’, दुसऱ्या क्रमांकावर ‘सम्राट पृथ्वीराज’ आणि तिसऱ्या क्रमांकावर ‘गंगुबाई काठियावाडी’ हे सिनेमे आहेत.

सिनेमासाठी वीकेंड राहिला शानदार
बॉक्स ऑफिस इंडियाच्या वृत्तानुसार, रविवारी सिनेमाच्या कमाईत २० टक्के वाढ पाहायला मिळाली. सिनेमासाठी वीकेंड खूपच शानदार राहिला. मागील ६ महिन्यात बॉक्स ऑफिसची जी परिस्थिती होती, ती लक्षात घेता या सिनेमाचे कलेक्शन चांगले असल्याचे म्हटले जात आहे. हैराण करणारी बाब अशी की, गुजरात, मध्य प्रदेश आणि राजस्थान यांच्या तुलनेत मेट्रो शहरांमध्ये सिनेमाने कमी कमाई केली होती.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

हे देखील वाचा