सध्या महाराष्ट्राच राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे. सत्तेत असलेल्या शिवसेनेच्या नेत्यांनीच बंडखोरी केल्याने आता ही सत्ता टिकणार की नाही असाच प्रश्न सर्वांना पडला आहे.याच राजकीय वादात आता मराठी कलाकारांनीही उडी घेतली आहे. अभिनेते आदेश बांदेकर (Aadesh Bandekar) यांनी आणि शरद पोंक्षे (Sharad Ponkshe ) यांच्यातील वाद सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे. काय आहे हा वाद चला जाणून घेऊ.
शरद पोक्षें हे मराठी सिने जगतातील एक लोकप्रिय अभिनेते म्हणून ओळखले जातात. आपल्या अभिनयाइतकेच ते सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असतात. अनेक विषयांवर ते आपले स्पष्ट मत सोशल मीडियावरुन व्यक्त करत असतात. काही दिवसांपूर्वीच त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणावर व्यक्त होताना एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला होता. यावरुनच शिवसेनेचे नेते आणि अभिनेते आदेश बांदेकर यांनी एक जुना व्हिडिओ शेअर करत हा शरद पोक्षें तुच का असा प्रश्न विचारला आहे.
आदेश बांदेकर यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरु एक व्हिडिओ शेअर केला होता. ज्यामध्ये शरद पोक्षेंनी त्यांच्या कॅन्सरच्या लढ्याविषयी माहिती दिली आहे. यावेळी बोलताना शरद पोक्षें यांनी या कठीण काळात सर्वात आधी आदेश बांदेकर धावून आल्याचे म्हणले आहे.मुलाखतीत शरद पोक्षें “आदेश बांदेकर म्हणाले, काळजी करू नकोस, मी उद्याच्या उद्या तुला नांदेकडे पाठवतो. हिंदू कॉलनीतील नांदे हे खूप मोठे डॉक्टर आहेत. त्यांच्याकडे पाठवले आणि मग ती सगळी प्रोसेस सुरु झाली. तर अशा प्रकारे पहिला आदेश उभा राहिला. आदेशमुळे उद्धव ठाकरेंना कळलं. त्यानंतर उद्धव ठाकरेंचा फोन आला. ते म्हणाले, शरद कसली काळजी करू नकोस शिवसेना आणि मी तुझ्या पाठीशी उभे आहोत. पैशापासून कसली काळजी करायची नाही.” असा संवाद झाल्याचे सांगताना दिसत आहेत.
View this post on Instagram
हाच व्हिडिओ पोस्ट करत आदेश बांदेकर यांनी हा शरद पोक्षें तुच का असा प्रश्न उपस्थित केला आहे. यावर शरद पोक्षेंनीही उत्तर देत “शरद पोक्षें काहीही विसरत नाही” असे म्हणताना त्यांनी लिहलेल्या एका पुस्तकाच्या पानाचा फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये त्यांनी असा हा सह्रदयी आदेश बांदेकर अशा शब्दात या सगळ्या प्रसंगाचे वर्णन केलेले दिसत आहे. सध्या या दोघांच्या सोशल मीडिया पोस्टची चांगलीच चर्चा रंगली आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
- हेही वाचा –
- ‘ही उद्धव ठाकरेंची सेन्सॉरशिप नाही तर दुसरं काय?’ ‘धर्मवीर’ चित्रपटातील सीनवरुन संतापले अमेय खोपकर
- ‘जुग जुग जियो’ च्या सेटवर वरुण कियारामध्ये झाले कडाक्याचे भांडण, दिग्दर्शकांच्या मध्यस्थीने मिटला वाद
- आलिया भट्टच्या प्रेग्नेंसीमुळे निर्मात्यांचे वाढले टेंन्शन, ‘या’ आगामी चित्रपटांचे काय होणार?