Friday, March 14, 2025
Home बॉलीवूड अय्यो! रक्तबंबाळ झालाय टायगर श्रॉफ, पाहा कोणी केली धुलाई

अय्यो! रक्तबंबाळ झालाय टायगर श्रॉफ, पाहा कोणी केली धुलाई

अभिनेता टायगर श्रॉफ (tiger shroff) बी-टाऊनच्या यशस्वी अभिनेत्यांपैकी एक आहे. ‘हिरोपंती’ या चित्रपटातून त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. आपल्या अ‍ॅक्शन आणि डान्सिंग कौशल्याने त्याने अल्पावधीतच इंडस्ट्रीत अमिट छाप सोडली आहे. सध्या टायगरकडे बॅक टू बॅक चित्रपट आहेत, ज्यासाठी तो रात्रंदिवस काम करत आहे. मात्र, टायगर श्रॉफचा एक ताजा व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामुळे त्याच्या चाहत्यांची चिंता वाढली आहे.

टायगर श्रॉफने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो जखमी दिसत आहे. शेअर केलेल्या बूमरॅंग व्हिडीओमध्ये टायगरच्या चेहऱ्यावर जखमा दिसत आहेत आणि त्याच्या चेहऱ्यावर रक्ताचे थेंबही दिसत आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर त्याच्या चाहत्यांना अभिनेत्याची काळजी वाटू लागली आहे. मात्र, तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही, कारण त्याचा हा व्हिडिओ त्याच्या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचा आहे.

https://www.instagram.com/reel/Cfdx4yapRgM/?utm_source=ig_web_copy_link

टायगर श्रॉफ सध्या त्याचा आगामी चित्रपट ‘गणपत : पार्ट १’ च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. टायगरने शेअर केलेला हा व्हिडिओ त्याच्या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचा असल्याचे समजते. अशा परिस्थितीत टायगरचा जबरदस्त अ‍ॅक्शन स्टंट चित्रपटात पाहायला मिळणार असून लाखो हृदयांवर राज्य करणारा टायगरही यात घायाळ होणार आहे, जो त्याच्या चाहत्यांना आवडणार नाही हे स्पष्ट आहे. बरं, ‘गणपत: पार्ट १’ मध्ये तो त्याच्या पहिल्या चित्रपटातील सह-अभिनेत्री क्रिती सेननसोबत दिसणार आहे. याशिवाय ‘बडे मियाँ और छोटे मियाँ’ हा चित्रपटही त्याच्याकडे आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

सोळाव्या वर्षी ‘त्या’ एका गाण्याने खळबळ माजवणारी ‘शर्ली’ आज झालीये सत्तावीस वर्षांची

खतरों के खिलाडी १२ : शिवांगी जोशीला सोडले मगरीच्या पिंजऱ्यात, भितीने अभिनेत्रीची झाली ‘अशी’ अवस्था

आली रे आली ‘कडक लक्ष्मी’ आली ‘तमाशा लाईव्ह’चे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला

हे देखील वाचा