Sunday, August 3, 2025
Home बॉलीवूड काली माताच्या हातात दिसला LGBTQचा झेंडा अन् सिगारेट, #ArrestLeenaManimekalai होतंय ट्विटरवर ट्रेंड

काली माताच्या हातात दिसला LGBTQचा झेंडा अन् सिगारेट, #ArrestLeenaManimekalai होतंय ट्विटरवर ट्रेंड

आतापर्यंत असे अनेक सिनेमे प्रदर्शित झाले आहेत, ज्याच्या नावावरून, पोस्टरवरून किंवा सीन्सवरून वाद उभे ठाकले गेले आहेत. आता असेच काहीसे पुन्हा एकदा घडले आहे. आगामी सिनेमा ‘काली’ या सिनेमाच्या पोस्टरवरून वाद निर्माण झाला आहे. या सिनेमाच्या पोस्टरवर हिंदू देवता धुम्रपान करत आहे आणि तिच्या हातात एलजीबीटीक्यूचा झेंडा असल्याचे दिसत आहे. त्यामुळे सिनेमाच्या पोस्टरविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या तक्रारीवर दिल्ली पोलिसांनी कारवाई केली आहे. दिल्ली पोलिसांच्या आयएफएसओ युनिटने एक तक्रार दाखल केली आहे.

एका वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, दिल्ली पोलिसांच्या आयएफएसओ युनिटने सांगितले आहे की, ‘काली’ या सिनेमाच्या वादग्रस्त पोस्टरसंबंधित भारतीय दंडविधान संहितेच्या कलम १५३अ आणि २९५अ या अंतर्गत प्राथमिक तक्रार दाखल केली आहे. या सिनेमाच्या पोस्टरवर धार्मिक भावनांना ठेच पोहोचवल्याचा आरोप करण्यात आला आहे.

याव्यतिरिक्त, उत्तर प्रदेश पोलिसांनीही याविरुद्ध कारवाई केली आहे. यूपीमध्ये दिग्दर्शिका लीना यांच्याविरुद्ध गुन्हेगारी कट, पूजा स्थळांवर गुन्हे, जाणूनबुझून धार्मिक भावना दुखावण्याच्या हेतूच्या आरोपांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा लखनऊ येथील हजरतगंज पोलीस ठाण्यात दाखल केला आहे.

या पोस्टरनंतर सोशल मीडियावर खळबळ माजली आहे. तसेच, हा वाद आता ‘अरेस्ट लीना मणिमेकलाई’ या हॅशटॅगसोबत ट्रेंड होत आहे. सोशल मीडियावर जे आरोप करत आहेत, त्यांचे असे म्हणणे आहे की, चित्रपट निर्मात्यांनी धार्मिक भावना दुखावल्या आहेत. अशातच ‘गौ महासभा’ नावाच्या एका संघटनेतील एका सदस्याने सांगितले की, त्यांनी दिल्ली पोलिसांकडे याची तक्रार दाखल केली आहे.

या वादाविरुद्ध प्रत्युत्तर देत चित्रपट दिग्दर्शिका लीना मणिमेकलाई (Leena Manimekalai) यांनी सांगितले आहे की, ते आपला जीवही देण्यासाठी तयार आहेत. त्यांनी या वादासंदर्भात लिहिलेल्या लेखाविरुद्ध ट्वीट केले आहे. त्यांनी तमिळ भाषेत लिहिले आहे की, “माझ्याकडे गमावण्यासाठी काहीच नाहीये. जोपर्यंत मी जिवंत आहे, मला निर्भीड आवाज बनून जगायचे आहे. जर यासाठी मला माझा जीवही द्यावा लागला, तरीही मी त्यासाठी तयार आहे.”

मदुराई येथे जन्मलेल्या लीना यांनी ‘काली’ या सिनेमाचा पोस्टर शेअर केला होता. तसेच, या पोस्टरसोबत त्यांनी लिहिले होते की, “हा सिनेमा टोरँटोमधील आगा खान संग्रहालय ‘रिदम्स ऑफ कॅनडा’चा भाग आहे.” विशेष म्हणजे, निर्मात्यांनी लोकांना हा पोस्टर समजून घेण्यासाठी सिनेमा पाहण्याचे आवाहनही केले आहे. त्यांनी दुसऱ्या एका लेखाला उत्तर देताना लिहिले की, “हा सिनेमा टोरँटो शहरातील रस्त्यांवर काली जेव्हा फिरत होती, त्यावेळी घडलेल्या घटनांसंदर्भात आहे. जर त्यांनी सिनेमा पाहिला, तर ते ‘अरेस्ट लीना मणिमेकलाई’ या ऐवजी ‘लव्ह यू लीना मणिमेकलाई’ या हॅशटॅगचा वापर करतील.”

दिग्दर्शिका लीना मणिमेकलाई यांच्याबाबत बोलायचं झालं, तर त्यांनी दिग्दर्शनाव्यतिरिक्त अभिनयातही आपला हात आजमावला आहे. त्यांनी सन २०११मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘सेंगादल’ या सिनेमात अभिनेत्री म्हणून कामही केले होते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

आलियाचा १३ सेकंदाचा ‘तो’ व्हिडिओ पाहून तिच्या आईलाही बसला शॉक, मुलीच्या चाहत्यांना उघडपणे म्हणाली…

थेट इंटरनेटवर लीक झाली होती अभिनेत्रीची ‘ती’ न्यूड क्लिप, घरातून बाहेर निघायचीही झालेली बोंब

घृणास्पद! जेव्हा फॅननेच घेतला होता ‘या’ कलाकारांचा जीव, एकीची २३व्या वर्षीच केलेली हत्या

हे देखील वाचा