प्रसिद्ध चॅट शो ‘कॉफी विथ करण’चा सातवा सीझन लवकरच सुरू होणार आहे. शोचा पहिला एपिसोड बी-टाऊनच्या प्रसिद्ध स्टार्ससोबत सुरू होईल आणि हे स्टार्स दुसरे तिसरे कोणी नसून ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’चे कलाकार रणवीर सिंग (Ranveer Singh) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) आहेत. अशातच मोस्ट अवेटेड चॅट शो ‘कॉफी विथ करण’च्या सातव्या सीझनचा नवा प्रोमो समोर आला आहे.
हनीमूनबद्दल बोलली आलिया भट्ट
व्हिडिओमध्ये, शोचा होस्ट करण जोहर (Karan Johar) रणवीर सिंग आणि आलिया भट्ट यांचे पहिले पाहुणे म्हणून स्वागत करतो आणि दोन्ही स्टार्स स्टेजवर जोरदार एन्ट्री करतात. प्रोमोमध्ये रणवीर आणि आलिया खूप मस्ती करताना दिसत आहेत. यादरम्यान करण आलियाला लग्नाशी संबंधित प्रश्न विचारताना दिसतो, ज्यावर आलियाने हनिमूनबद्दल आपले मत व्यक्त केले. अभिनेत्री म्हणते, “हनिमूनसारखं असं काही घडत नाही, कारण त्यावेळी तुम्ही थकलेला असता.” (alia bhatt talking about suhagrat on karan johar show)
आलिया भट्ट-रणबीर कपूरचे लग्न
आलिया भट्टने अभिनेता रणबीर कपूरसोबत (Alia Bhatt) लग्न केले आहे. दोघांची पहिली भेट ‘ब्रह्मास्त्र’च्या सेटवर झाली होती. आलिया आणि रणबीरने जवळपास ५ वर्षे एकमेकांना डेट केले आणि १४ एप्रिल २०२० रोजी जवळचे नातेवाईक आणि ठराविक मित्रमंडळीच्या उपस्थितीत लग्न केले.
आलिया भट्टची प्रेग्नेंसी
काही दिवसांपूर्वीच, लग्नाच्या दोन महिन्यांनंतर आलिया भट्टने तिच्या गर्भधारणेची घोषणा केली. आलिया सध्या तिच्या प्रेग्नेंसीमुळे खूप चर्चेत आहे. याशिवाय तिच्या ‘डार्लिंग्स’ या चित्रपटाचा ट्रेलरही रिलीझ झाला आहे, जो चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा