Thursday, April 24, 2025
Home बॉलीवूड ‘व्हिडीओ लवकर पाहा नाहीतर होईल डिलीट’, लवकरच तिसऱ्यांदा आई होणाऱ्या लिसा हेडनचा हटके व्हिडीओ पाहिलाय का?

‘व्हिडीओ लवकर पाहा नाहीतर होईल डिलीट’, लवकरच तिसऱ्यांदा आई होणाऱ्या लिसा हेडनचा हटके व्हिडीओ पाहिलाय का?

या वर्षीच्या सुरुवातीस बऱ्याच अभिनेत्रींना आई होण्याचा अनुभव घेतला. यात काहीजणी दुसऱ्यांदा तर काहीजणी प्रथमच आई बनल्या. या अभिनेत्रींमध्ये अनुष्का शर्मा, करीना कपूर व अनिता हसनंदानी ई.चा समावेश आहे.

बॉलीवूड अभिनेत्री लिसा हेडनही पुन्हा आई होणार आहे. ही माहिती स्वत: लिसाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर दिली आहे. आता लिसाने सोशल मीडियावर एक व्हिडिओ टाकला आहे, ज्याबद्दल ती म्हणत आहे की, व्हिडिओ पाहा, नाहीतर तो हटविला जाऊ शकतो.

लिसा हेडन आता तिसऱ्यांदा आई होणार आहे. लिसाने तिच्या प्रियकर डीनो लालवानीशी 29 ऑक्टोबर 2016 रोजी लग्न केले होते. थायलंडच्या फुकेट येथील अमनपुरी बीच रिसॉर्टमध्ये हे दोघे लग्नबंधनात अडकले. त्याचे फोटो लिसा हेडनने तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केले होते.

लिसाचा पती पाकिस्तानात जन्मलेल्या ब्रिटीश उद्योजक गुल्लू ललवानी यांचा मुलगा आहे. डीनो आणि लिसाने दीड वर्ष डेटिंगनंतर लग्न केले होते. लिसाने 17 मे, 2017 रोजी पहिला मुलगा जॅकला जन्म दिला. 25 जानेवारी 2020 रोजी लिसा दुसऱ्यांदा आई बनली आणि तिने मुलगा लिओला जन्म दिला. आता जून 2021 मध्ये तिसऱ्या अपत्याची प्रसूती होईल असे लिसाने सांगितले आहे.

https://www.instagram.com/p/CLszbj6ljpO/?utm_source=ig_embed

लिसा हेडन सोशल मीडियावर सतत फोटो आणि व्हिडीओ शेअर करत आहे. त्यात तिचा बेबी बंपही पाहायला मिळत आहे. नुकताच तिने एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात ती तिच्या गर्भवती मैत्रिणींसह डान्स रूटीन करताना दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करत तिने लिहिले आहे की, “मी नंतर व्हिडिओ हटवेल, पण मी आव्हान करते की तुम्ही तो पाहा आणि कसा आहे ते सांगा.” लिसा हेडनचा हा व्हिडिओ पाहून चाहते तिचे अभिनंदन करत आहेत.

लिसा हेडनच्या कारकीर्दीबद्दल बोलायचे झाले, तर तिने 2010 मध्ये आलेल्या ‘आयशा’ या चित्रपटातून पदार्पण केले होते. पण तिला खरी ओळख ‘क्वीन’, ‘हाऊसफुल 3’ आणि ‘ऐ दिल है मुश्कील’ या चित्रपटातून मिळाली. लग्नानंतर लिसा चित्रपटांमध्ये कमी परंतु, अ‍ॅडव्हेंचर करताना अधिक दिसली. लिसाला समुद्र खूप आवडतो. ती बहुतेक वेळा समुद्राकिनारी सुट्ट्या घालवताना दिसते.

हे देखील वाचा