Saturday, January 17, 2026
Home अन्य मिथुन चक्रवर्ती यांच्या सुनेचा ‘गुड़ नाल इश्क मीठा’ गाण्यावरील भन्नाट डान्सचा व्हिडिओ तुफान व्हायरल

मिथुन चक्रवर्ती यांच्या सुनेचा ‘गुड़ नाल इश्क मीठा’ गाण्यावरील भन्नाट डान्सचा व्हिडिओ तुफान व्हायरल

कलाकार त्यांच्या शूटिंग सेटवर तासनतास काम करत असतात. त्यात जर मालिकांचे सेट असतील तर हे कलाकार दिवसातील १३/१४ तास सलग शूटिंग करत असतात. त्यांना विरंगुळा म्हणून ते फावल्या वेळेत विविध मार्गांनी त्यांचे मनोरंजन करून घेतात. त्याविषयीचे अनेक व्हिडिओ, फोटो सोशल मीडियावर व्हायरल देखील होतात. असाच एक व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होत आहे.

हा व्हिडिओ आहे स्टार प्लसच्या ‘अनुपमा’ मालिकेच्या सेटवरचा. या मालिकेत काव्या झवेरीची भूमिका साकारणाऱ्या मदालसा शर्माच्या डान्सचा हा व्हिडिओ सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये मदालसा तिच्या सहायक कलाकारांसोबत ”गुड़ नाल इश्क मीठा’ या गाण्यावर भन्नाट डान्स करत आहे.

मदालसा ही मिथुन चक्रवर्ती यांची सून असून तिच्या या व्हिडिओवर जबरदस्त कमेंट्स येत आहे. मदालसाने मिथुन यांचा मुलगा मिमिह चक्रवर्तीसोबत लग्न केले आहे. मदालसा ही दाक्षिणात्य सिनेसृष्टीत आणि त्यातही तेलगू इंडस्ट्रीमधील मोठे नाव आहे.

 

मदालसाने २००९ साली तेलगू सिनेमातून अभिनयाच्या क्षेत्रात पाऊल टाकले. तिने तेलगूसोबतच हिंदी, कन्नड, तामिळ, जर्मन, पंजाबी आदी अनेक भाषांमध्ये सिनेमांमध्ये काम केले आहे. मदालसा सोशल मीडियावर चांगली सक्रिय असून ती तिचे अनेक व्हिडिओ पोस्ट करत असते.

हे देखील वाचा