Wednesday, April 30, 2025
Home अन्य ‘नागीण’मधील ‘या’ अभिनेत्रीने ९ वर्षाने लहान असणाऱ्या बॉयफ्रेंडसोबत केले गुपचूप लग्न

‘नागीण’मधील ‘या’ अभिनेत्रीने ९ वर्षाने लहान असणाऱ्या बॉयफ्रेंडसोबत केले गुपचूप लग्न

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री मृणाल देशराज (mrunal desharaj) हीच्याबाबत एक बातमी समोर आली आहे. अलीकडेच तिने प्रियकर आशिम माथनसोबत गुपचूप लग्न केले. त्यांचे लग्न अतिशय खाजगी पद्धतीने पार पडले, ज्याची कोणालाच कल्पना नव्हती. इतकंच नाही तर अभिनेत्री रिसेप्शन खासगी पद्धतीने करण्याचा विचार करत आहे. एका ताज्या मुलाखतीत तिने आपल्या लग्नाविषयी सांगितले आहे.

दिलेल्या एका मुलाखतीत मृणालने आता लग्नगाठ बांधल्याचा खुलासा केला आहे. ती म्हणाली, “माझे लग्न झाले. ही एक गुप्त बाब होती. माझ्याकडे रिसेप्शन आहे आणि त्याआधी मेहंदी आणि इतर विधी देखील झाले आहेत. रिसेप्शन देखील एक खाजगी असेल.” आम्ही तुम्हाला सांगतो की, काही वेळापूर्वी, तिने मुलाखतीत खुलासा केला होता की, ९ जून २०२२ रोजी तिने आशिमसोबत एंगेजमेंट केली होती.

माध्यमातील वृत्तानुसार मृणालचा पती अशिम हेल्थ आणि वेलनेस इंडस्ट्रीशी संबंधित आहे. अभिनेत्रीने एका मुलाखतीत सांगितले होते की, ती तिच्या पतीला सप्टेंबर २०२१ मध्ये एका कॉमन फ्रेंडच्या पार्टीत भेटली होती आणि त्याचवेळी दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले होते. आशिमने गोव्यातील अभिनेत्रीला रोमँटिक पद्धतीने प्रपोज केले.

मृणाल आपने तिच्यापेक्षा ९वर्षांनी लहान असीमसोबत लग्न केले आहे. तिचा नवरा आता ३४ वर्षांचा आहे, तर अभिनेत्री ४३ वर्षांची आहे. अभिनेत्रीने तिच्यापेक्षा वयाने लहान असलेल्या व्यक्तीशी लग्न करण्याची ही पहिलीच वेळ नाही.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

जॅकलिन फर्नांडिज करणार हॉलिवूडमध्ये पदार्पण, सिनेमाचा पोस्टर रिलीज

वयाच्या ५६व्या वर्षीही ‘फिट अँड फाईन’ आहे शाहरुख, बाथरूममध्येच शर्टलेस झाला ‘किंग खान’

अनुपमा रणबीरला देतेय बाबा बनण्याचं ट्रेनिंग, व्हिडिओ घालतोय सोशल मीडियावर धुमाकूळ

 

 

हे देखील वाचा